Home महाराष्ट्र नगरसेवक तथा गट नेते ॲड. मिथिलेश भय्या केंद्रे यांनी मान्सूनपूर्व तयारीचा घेतलाआढावा

नगरसेवक तथा गट नेते ॲड. मिथिलेश भय्या केंद्रे यांनी मान्सूनपूर्व तयारीचा घेतलाआढावा

47

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24मे):-शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी नगरसेवक तथा गटनेते ॲड. मिथिलेश भय्या केंद्रे यांनी नागरिकांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून संवाद साधला. यावेळी साचलेले पाणी, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांची दुरवस्था तसेच स्वच्छतेशी संबंधित समस्या तपासून पाहण्यात आल्या.

पाहणीदरम्यान संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या असून, प्रभागातील समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी प्रभागातील दिवाबत्तीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून, आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांची माहिती प्रत्यक्ष प्रभागात फिरून घेण्यात आली.

यासोबतच गंगाखेड–परळी रस्त्याची दुतर्फा पाहणी करण्यात आली. गतवर्षी पावसाळ्यात करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील झाडांची स्थिती तपासण्यात आली. महाराणा प्रताप चौकातील ‘I Love Gangakhed’ डिजिटल विद्युत प्रकाशमान फलक तसेच सार्वजनिक शौचालयांची माहिती घेण्यात आली. शहरातील तुंबलेल्या गटार व नाल्यांची जेसीबीद्वारे सफाई करण्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.

या वेळी नगरसेवक अजीज खान, दिलीपकुमार सारडा, राजेंद्र लटपटे, नितीन गित्ते, धनंजय केंद्रे, राजेश सोळंके यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.