Home महाराष्ट्र वंचित आघाडीच्या मोफत रेती निवेदनाची तहसीलनें घेतली दखल

वंचित आघाडीच्या मोफत रेती निवेदनाची तहसीलनें घेतली दखल

27

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.26मे):-तहसील कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देताच पंचायत समिती प्रशासनाने 5 ब्रास मोफत रेती देण्यासाठी कार्यवाही ला सुरवात केल्याचे अधिकारी यांनी सांगितले..

” मागेल त्याला घर “योजने अंतर्गत रमाई,प्रधानमंत्री योजना सुरु असून जी आर मध्ये नुसार मोफत रेती लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात याव्या अशी मागणी करतांच युद्ध पातळीवर तय्यार करून तहसिल प्रशासनाकडे कार्यवाहि साठी पाठवून दिल्या आहेत परंतु रमाई किती..? प्रधानमंती किती..? यावर मात्र प्रशासनाने मोन पाळले तहसिल कार्यालयातुन 500 ते 700 लाभार्थ्यांना मोफत वाळूचे आदेश देण्यात आले असून पंचायत समिती व तहसिल प्रशासनाचे कॉतूक सगळीकडे होतांना दिसून येत आहे.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडी शुद्धोदन सावंत,लहू केदारे, कृष्णा सावंत,प्रवीण रायभोळे, गोविंद केदारे, संग्राम चौधरी, नितेश मोरे,अशाबाई वैजनाथ लोखंडे,लक्ष्मीबाई सखाराम केदारे यांनी प्रशसनाचे आभारही मानले.