Home चंद्रपूर जागतिक नेत्रदान दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबीर व नेत्र दान मार्गदर्शन संपन्न

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबीर व नेत्र दान मार्गदर्शन संपन्न

81

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.11जून):-ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय, चौगान ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर यांच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबीर व मरणोत्तर नेत्रदान विषयक जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ् रामटेके साहेब नेत्र चिकित्सक अधिकारी, गोनशेटवार साहेब औषधी निर्माता अधिकारी प्रा. आ. केंद्र चौगान, दोनाडकर साहेब MPW चौगान, निहाटे सर, प्रधान मॅडम, मैंद मॅडम उपस्थित होते. सहभागींच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नियमित तपासणीचे महत्त्व आणि विविध नेत्र विकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मरणोत्तर नेत्र दान करणार याबाबत शपथ घेण्यात आली.

यावेळी मरणोत्तर नेत्रदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया, त्याबाबत असलेल्या गैरसमजुती आणि नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना मिळणारे नवे जीवन याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. अनेकांनी नेत्रदानाचा संकल्प करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारीवृंद तसेच सहकार्य करणाऱ्या डॉक्टरांचे विशेष योगदान लाभले. समाजामध्ये नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करून अंधत्व निर्मूलनासाठी हातभार लावण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. उपस्थितांनी अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.