Home महाराष्ट्र साकोलीत कोवळ्या विद्यार्थ्यांना सिगारेट देतो तरी कोण..? 

साकोलीत कोवळ्या विद्यार्थ्यांना सिगारेट देतो तरी कोण..? 

69

▪️भरचौकात, टपरींच्या मागे युवा अल्पवयीन मूले धुम्रपानाच्या जबर आहारी • नगरपरिषद घेते टॅक्स पण या संतप्त प्रकरणी कधी लक्ष दिले का.? 

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)

साकोली(दि.14जून):-आजच्या स्थितीत साकोली सेंदूरवाफा शहरातील प्रत्येक चौकातील टप-यांच्या मागे, सार्वजनिक ठिकाणी एकांतात अगदी कोवळी अल्पवयीन विद्यार्थी मुले सिगारेट ओढतांना दिसतात. या अश्या मुलांना धुम्रपान वस्तू देण्यासाठी प्रतिबंध व दंड असूनही त्यांना सिगारेट देतो तरी कोण.? दूसरीकडे नगरपरिषद प्रत्येक पानटपरी चालकांकडून दैनंदिन टॅक्स वसूल करतात. पण हे भयंकर विषय नगरपरिषदेच्या लक्षात येत नाही का.? सार्वजनिक स्थळी धुम्रपानावर बंदी आणावी हे प्रथम नगरपरिषदेचे कार्य आहे. पण याकडे लक्ष का नाही.? याची दोन दिवसात अंमलबजावणी करण्याची मागणी “व्हीएसएफ” समुहाने केली आहे. 

            बरेच जागृत दक्ष सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, आज दररोज असंख्य कोवळी अल्पवयीन विद्यार्थी भरचौकात टपरींच्या मागे, हॉटेलच्या आतमध्ये बसून चक्क धुम्रपान करतात. तलाव चौपाटीवर सायंकाळी ७ नंतर चक्क काही कॉलेजचे मुले व मुली सुद्धा धुम्रपान करतांना जनतेने पाहीले आहे.

तसे पाहिले असता अल्पवयीन मुलांना धुम्रपान करणाऱ्या तंबाखूजन्य वस्तू विकणे हा दंडनीय गुन्हा आहे. तरीसुद्धा येथील नगरपरिषद शहरातील सर्व टप्प्यांकडून मात्र टॅक्स वसूल करीत आहेत. पण हे नियमाला धाब्यावर बसविण्याचे अती संतापजनक व संवेदनशील प्रकरणी नगरपरिषद निद्रावस्थेत आहे का.? या भयाण दृश्यांमुळे उद्या आपल्या सर्वांची मुले मुली चक्क पानठेल्यावर, सार्वजनिक बालोद्यान ठिकाणी जाऊन बिनधास्तपणे धुम्रपान करतील हेच नगरपरिषद जनतेला समोरील चित्र शहरात दाखवतील काय.? असा ज्वलंत प्रश्न “व्हीएसएफ” ने नगरपरिषदेला केला आहे.

तर याची दोन दिवसांत तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा स्थानिक नगरपरिषदेने आजपर्यंत शहरात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कोणती व कुठे कुठे कारवाई केली याची संपूर्ण माहिती ही माहिती अधिकारात घेतली जाईल व तसा अहवाल जिल्हाधिकारी भंडारा यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल. असा संतप्त इशारा “व्ही एस एफ” व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशननेचे अनिल कापगते, किशोर बावणे, आशिष चेडगे, अंकित कापगते, मुकेश पंचभाई, महेश पोगळे चंद्रशेखर कापगते मनिष झिंगरे आदींनी दिला आहे.