Home चंद्रपूर पंधरा लाख तीस हजार रुपयांची चोरी-आरोपी चोवीस तासात तेलंगणातुन जेरबंद

पंधरा लाख तीस हजार रुपयांची चोरी-आरोपी चोवीस तासात तेलंगणातुन जेरबंद

95

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.१४जून):-सोनापूर येथील एका किराणा दुकानाचे दार तोडून दुकानातील १५ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करून तेलंगणात पळून गेलेल्या आरोपीला चोवीस तासात मुद्देमालासह लाठी पोलिसांनी अटक केली आहे. गोंडपीपरी तालुक्यातील सोनापूर येथील समीर अरुण चौमटेवार यांचे किराणा दुकानाचे रात्री दार तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील ड्रॉवर मधील ३० हजार आणि कापडी बॅगेतील १५ लाख असे एकूण १५ लाख ३० हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार लाठी पोलीस ठाण्यात देण्यात आली लगेच प्रभारी ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार यांनी पोलीस कर्मचार्यासह घटनास्थळी पोहचून निरीक्षन केले.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी आशिष जानकिराम चौधरी करताना स्पष्टपणे दिसून आले. गुन्हा उघडकीस येताच तात्काळ तपासचक्रे फिरवून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आले एक पथक तेलंगणा व दुसरे पथक गडचिरोली येथे रवाना करण्यात आले तपासादरम्यान आरोपीचे हालचालीबाबत तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी तेलंगणा राज्यात असल्याचे खात्री झाली त्यानंतर लाठी पोलीस ठाण्यातील पथक रवाना झाले दरम्यान चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकही मदतीसाठी दाखल झाले स्थानिक गुन्हे शाखा आणि लाठी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत आरोपी आशिष जानकिराम चौधरी यास तेलंगणा राज्यातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार यांनी अटक करून पुढील तपास सुरू केला आहे

 ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक,यांचे मार्गदर्शनात लाठी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार आणि त्यांचे पोलीस कर्मचारी,तसेच चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखा कर्मचारी यांनी केली आहे.