?उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तथा बाजार समीतीचे मुख्य प्रशासक प्रभाकर सेलोकर यांची उपस्थिती
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.8मार्च):-शेतकऱ्यांनी घेतलेले धानाचे उत्पादन त्यांना सहजपणे योग्य दरात विकता यावे यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध मध्यवर्ती गावांत कार्यरत आहेत.
त्याअनुषंगाने आधारभूत भात खरेदी योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या धान खरेदी बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपुरी येथे आढावा सभा घेण्यात आली. या सभेस ब्रम्हपुरी च्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय, अन्न पुरवठा अधिकारी प्रविण राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक प्रभाकर सेलोकर, तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रांचे व्यवस्थापक व बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.
सदर बैठकीत तालुक्यात असलेल्या शिल्लक धान खरेदी करणे बाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत चा पाठपुरावा करण्यात येईल असे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयाबाबत केंद्र व्यवस्थापक व शेतकरी यांचे मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असे मुख्य प्रशासक प्रभाकर सेलोकर यांनी कळविले आहे.