म्हसवड येथे क्रान्तिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

    54
    Advertisements

    ✒️सचिन सरतापे(म्हसवड,माण)मोबा.9075686100

    म्हसवड(दि.11एप्रिल):-क्रान्तिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी राजकीय,सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील जनतेला क्रान्तिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले होते.

    या आवाहनाला प्रतिसाद देत म्हसवड येथील महात्मा फुले मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकात असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि “सोशल डिस्टन्सीग”च्या नियमांचे पालन करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांना अभिवादन करणेत आले.

    यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट,शिवसेना पदाधिकारी शिवदास केवटे,महेश लिंगे,दिनेश गोरे,तात्या लांब,आनंद बाबर,आंबेडकर जयंतीचे माजी अध्यक्ष सचिन सरतापे,सुमित सरतापे,पत्रकार नागेश डोबे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले.