१८ वर्षावरील नागरिकांसाठी नागभीड येथील लसीकरण केंद्र सुरु

    54
    Advertisements

    ?युवक व युवतींचा लक्षणीय सहभाग

    ✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागभीड(दि.2मे):- येथील जनता कन्या विद्यालय येथे १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसिकरण केंद्राचे उद्घाटन नागभीडचे प्रथम नगराध्यक्ष प्रा.डॅा.उमाजी हिरे यांचे हस्ते आज पार पडले. याप्रसंगी पं.स. चे सभापती प्रफुल्ल खापर्डे , जि.प.सदस्य संजय गजपुरे , न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर , नागभीडचे तहसिलदार मनोहर चव्हाण , तालुका आरोग्य अधिकारी डॅा.विनोद मडावी , ग्रामिण रुग्णालय नागभीड चे वैद्यकीय अधिक्षक डॅा.रवी गावंडे , कोविद केअर सेंटर चे डॅा.श्रीकांत कामडी , नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॅा.प्रियंका मडावी , जनता कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक हरिश्चंद्र मेहेर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .

    भारतमातेच्या जयघोषात सुरु झालेल्या या लसीकरण केंद्रावर सर्वप्रथम विक्रम हिरे या २३ वर्षीय युवकाला कु.अर्चना निखार या अधिपरिचारिकेने कोविशिल्ड लस दिली. जिल्ह्यात आजपासुन केवळ ७ केंद्रावर १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्या आलेले आहे. नागभीड येथे सध्या यासाठी कोवीशिल्ड च्या १४०० डोज प्राप्त झाले असुन दररोज २०० व्यक्तींचे लसीकरण केल्या जाणार आहे.
    नागभीड व परिसरात मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी जनजागृती झाली असल्याने अवघ्या काही तासातच आगामी ७ दिवसांची ॲानलाईन नोंदणी फुल्ल झाली आहे. आज सकाळी ९ वाजेपासुनच लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टेंन्सिगचे पालन करीत ॲानलाईन नोंदणी केलेल्यांनी उत्साहात गर्दी केली होती.

    तालुका प्रशासन व न.प. च्या वतीने या केंद्रावर पिण्याचे पाण्यासह सुरक्षिततेचीही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ॲानलाईन नोंदणी केलेल्यांनीच दिलेल्या तारीख व वेळेतच केंद्रावर येउन लसीकरण करुन घ्यावे अशी विनंती तालुका आरोग्य अधिकारी डॅा.विनोद मडावी यांनी केली असुन या केंद्रावर वेळेवर नोंदणी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर ४५ वर्षावरील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालयात नियमितपणे लसीकरण सुरु राहणार असल्याचे सांगत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व घोषित केलेल्या उपकेंद्रांवर लसींच्या उपलब्धतेनुसार ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार असल्याचे स्पष्ट केले . आज या केंद्रावर नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी , तालुक्यातील सर्व सिएचओ , नागभीडच्या आशा सेविका , न.प. कर्मचारी , तालुका आरोग्य अभियानाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.