बापाचे कर्तव्य की सामाजिक सुरक्षा

    53
    Advertisements

    विज्ञानाच्या कक्षा झपाट्याने वाढत आहेत. विज्ञान स्वीकारणाऱ्या देशात शिक्षण,आरोग्य आणि रोजगार यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करून नियोजन बद्ध योजना बनविल्या जात आहेत.त्यामुळेच मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे, त्यासाठी आठ तास,बारातास नोकरी करण्याची गरज राहली नाही. डिजिटल,स्मार्ट वर्क घरात बसून किंवा कुठे ही बसून होऊ शकते. भारतात मात्र असे नाही. इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिर्डी किंवा शेगाव पायी चालत पदयात्रा काढाव्या लागतात. आणि महापूजाचे आयोजन करावे लागते.तेव्हाच शंभर टक्के खात्रीने आर्थिक विकास होतो. कोरोनाच्या महामारीत लॉक डाऊन कोणासाठी आहे?राज्य सरकारला त्यांच्या प्रशासकीय अधिकारी वर्गाला,पोलीस यंत्रणेला काम धंदा नाही म्हणून लॉक डाऊन सुरु केला आहे काय?. नाही मित्रांनो!. भारतीय सविधांनाने संकट समयी आपत्कालीन योजनेचे नियोजन भारतीय संविधानांत लिहून ठेवले आहे.भारतीय नागरिकांच्या जीविताची दक्षता घेऊन त्यांच्या जीवितहानी होणार नाही त्यासाठी कडक आणि योग्य ती उपाय योजना करावी असे संविधानात लिहून ठेवले आहे.

    म्हणूनच तुमची काळजी घेतली जात आहे. जगात नोव्हेंबर डिसेंबर 2019 ला कोरोनाची प्रचंड लाट उसळली असता,भारताचा अदानी अंबानीचा इमानदार चौकीदार २२ मार्च 2020 पर्यंत दखल घेतली नाही.कारण त्यांना मनुची मनुस्मृती राबविण्याची तीव्र इच्छा होती.पण जागतिक पातळीवरून दबाव वाढल्या नंतर चौकीदार बाबा दाढी खाजवत खाजवत जागी झाले आणि २२ मार्चला २३ मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला.गोरगरीब कष्टकरी असंघटीत कामगार मजुरांचे काय हाल होतील.कारण हा वर्ग दररोज रोजगार करून पोटभर अन्न खातो.लॉक डाऊन मुले रोजगार बुडाल्यामुळे हे आणि त्यांचे कुटुंब कसा जगेल यांचा विचारच केला गेला नाही.त्यामुळेच घरातील तरुण मुले संध्याकाळी घरातील चूल पेटविण्यासाठी घरा बाहेर पडतात.त्यात त्यांचा अपघात होऊन,तर काही पोलिसांच्या हातचा मारखाऊन किडयामुंगींसारखी मरायला नकोत म्हणून बापाचे कर्तव्य आणि सामाजिक सुरक्षा याबाबत खरं म्हणजे आपण म्हणजे वडीलधारयांनी मुलांशी महत्त्वाचं बोलायला हव. त्यांच्याशी संवाद वाढायला हवा.

    त्यासाठी पालक म्हणून हे नक्की करा.कोणतीही टूव्हीलर फोर व्हीलर गाडी लायसेन्स असल्याशिवाय मुलांच्या हातात देवू नका.आपले मित्र,नातेवाईक यांनी आपल्या मुलाचे “रफ ड्रायव्हिंग” बाबतीत आपल्याला सांगितल्यास त्याकडे दूर्लक्ष नको. मुलाला लगेच जाब विचारून शांतपणे समजावून सांगा.मुलाला बाईक घेताना त्याबरोबर “हेल्मेट” लगेच घ्या.मुलगा असो की मुलगी हेल्मेट डोक्यावर घालायला सांगा शो साठी सोबत ठेऊ नये. आवश्यक काम असेल तरच गाडी वापरावी.एक किलोमीटर अंतराचे आत काम असल्यास मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या. मुले ऐकणार नाहीत हे सत्य असले तरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी वजन वाढू न देण्यासाठी एक किलोमीटर च्या आत पायी ये जा करणे आवश्यक आहे. त्यांचे महत्व डॉक्टर मेडिकलच्या भाषेत सांगावे लागेल. रिकाम्या पोटी गाडी चालवू नका,नास्ता जेवण योग्यवेळी योग्य प्रमाणात खावे.कोणते कोणते ही वाहन लवकर जाण्यासाठी नसून सोयीनुसार जाण्यासाठी असते हे लक्षात ठेवावे.कोणत्याही गाडीवर बसतांना तिची वेग मर्यादा आणि सीट मर्यादा लक्षात ठेवावी.दोन सीट च्या गाडीवर ट्रिपल सीट जाणे म्हणजे यमाला आमंत्रण देणे असते. यम म्हणजे कोण?. नियम मोडला तर नि वजा यम म्हणजे अपघात असे वाहतूक सुरक्षतेच्या नियमात सांगितेले आहे.

    त्याचे पालन करणे सर्वांची सामाजिक जबाबदारी असते.म्हणूनच वाहनावर आणि स्वतः च्या ताकदी बद्दल “फाजील आत्मविश्वास” दाखवू नका. गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतः ला विचारूनच गाडी स्टार्ट करा. वळणावर आजीबात “ओव्हरटेक” नको. गावातील रोडवर आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रोडवर किती वेग मर्यादा असावी हे प्रत्येक शंभर मीटर वर लिहलेले असते.त्याची दखल वाहन चालकांनी घेतली पाहिजे.किंवा वाहन चालक ती घेत नसेल तर सोबत च्या सहप्रवाशांनी त्याची आठवण करून देणे आवश्यक असते.
    रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका.रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली अजिबातच उतरू नका. कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून सरकार सर्व माहिती जागेवर देत असते.ती वाचून त्यांची दखल घेऊन जबाबदारीने वागून अंमलबजावणी करावी की दुर्लक्ष करून अपघाताला आमंत्रण द्यावे हे प्रत्येकावर अवलंबून असते डंपर,ऊसाचा ट्रक,सिमेंट- काँक्रीट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर अशा हेवी वाहनापासून नेहमीच सावध असणे उत्तम असते.यांच्या जास्त जवळ जाणे शक्यतो टाळावे.

    आजकाल अपघाताचे प्रमाण का वाढले?. तर मोबाईल कानाला लावून किंवा इअरफोन लावून बोलणे आणि गाडी चालवने हा आत्मविश्वास कधी धोकादायक ठरते समजत सुद्धा नाही.तेव्हा सर्व वेळ निघून गेली असते. गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग केली पाहिजे.दोन्ही ब्रेक- मागचा – पुढचा लागतो की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे.मनावरच्या ब्रेक साठी जागोजागी बोर्ड लावले आहेत ते वाचूनच पुढे प्रवास करावा.दोन्ही ब्रेकचा वापर करा. गाडीचा टेल लँप आणि ब्रेकलाईट लागणे खूप महत्वाचा असतो.कोणत्याही वळणावर वळताना इंडीकेटरचा वापर करा.
    मुलांनो आपल्या मित्रावर खरोखर मनापासून प्रेम करत असाल तर आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्याच्या आई-वडीलांना वेळोवेळी द्यावी.जवळचा मित्र अपघातात गेल्यावर आईवडिलाना मित्रामुळे माझा मुलगा बिगडला असा समज असतो.तो वेळीच दूर करा.प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलातील अवगुण दिसत नसतात.कोणत्याही नियमाचे पालन न करता पोलिसांची कायद्याची भिती न बाळगणाऱ्या मुलांना सर्वांनीच समज दिली पाहिजे.अपघात झाल्या नंतर मृत्यू झाल्यास आठ पंधरा दिवस दुखात जातील.पण अपघातात हात पायाने अपंग झाल्यास किती प्रकारच्या यातंना सर्व कुटुंबाला भोगाव्या लागतात याचा अंदाज करता येत नाही.म्हणूनच वेळीच सावध असले पाहिजे.बापाचे कर्तव्य कि समाजाची सामाजिक सुरक्षा हा बाबत प्रत्येकांनी जागृत असले पाहिजे.वाहतूक नियमांचे सुचनाचे पालन करा. गाडीवर मागे-पुढे पिवळे रेडियम लावा.

    रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे घालू नका. स्वताची सुरक्षा स्वताच्या हाती असते.त्यासाठी पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा.पुढच्या वाहनापासून किमान 15 फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा. जलद जाण्याच्या गडबडीत कट मारुन जाऊ नका.टूव्हिलर वापरताना रस्त्यावर आपण पाहूण्यासारख वागाव. मोठ्या वाहनांचा आदर करावा.ट्रक,बस इ.वाहनांचा DT ड्रायव्हिंग टाईम जास्त असतो. त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका. ब-याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर स्ट्रेस आणि टेंशन मधे असतात.सर्व गावकऱ्यांनी बेशिस्तपणे वाहन चालविणारया मुलांची माहिती त्याच्या पालकांना किंवा पोलिस स्टेशनला द्यावी.मुलांनो लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी आयुष्य एकदाच येते, आयुष्य भरभरून आणि हसत खेळत जगायला हवे असेल तर स्वत:ची कळजी घ्या.घरी आपली आई वडिल,बायको मुल वाट पाहत असतात हाचं भान ठेवून गाडी चालवा.आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन मोबाईल असतो एखाद्या ठिकाणी अपघात बघितला तर लोक मदत करण्यासाठी पुढे येत नाही.पण मोबाईल काढून शुटींग करतात आणि सोशल मिडीयावर शेयर करतात.यामुळेच अनेक अपघाताच्या व्हीडीवो सोशल मिडीयावर येत असतात.गेल्या अनेक वर्षा पासून मी केवळ कामगारांची काम करतांना सेफ्टी सुरक्षा पाहत असतो.लोडिंग अनलोडिंगचे काम असल्यास प्रथम वाहन चालकाचे लायसन्स,पी ओ सी, इन्शुरन्स पॉलीशी,रोड परमिट,चेकलिस्ट,फॉर्म ११ असे सर्व कागद पत्र तपासण्याची जबाबदारी वाहतूक निरीक्षकाची असते.पण ही जबाबदारी कोणताही पोलीस अधिकारी परिपूर्ण पार पाळत नाही.

    मोठ्या कंपनीत या सर्व नियमांचे काटेकोर पालन केल्या जाते.त्या शिवाय काम करण्याची परवानगी दिली जात नही.म्हणूनच अपघाताचे प्रमाण शून्य असते.कंपनी च्या बाहेर सुरक्षित नोकरी करणाऱ्या व सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या मुलांचे अपघात मोठ्या प्रमाणत होत असतात.त्यासाठी आई वडिलांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे.म्हणूनच मी लिहतो बापाचे कर्तव्य आणि समाजाची सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.

    ✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य