मराठा आरक्षणात दिरंगाई करण्या प्रकरणी राज्य सरकार व केंद्र सरकारचा निवेदन देऊन निषेध

    49
    Advertisements

    ✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    उमरी(दि.6मे):- गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या लढ्याला परत एकदा निराशा आली असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाही असे म्हणत आरक्षण रद्द केले यात बाजू मांडण्यात कमी पडलेल्या राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे सकल मराठा समाज व सर्व संघटनांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू असून यात तब्बल 48 मराठा बांधवांचे बलिदान गेले अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद झाले.

    अनेक सामान्य वरती पोलिस गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा मराठा समाजाचा प्रश्न “जैसे थे च” राहिला माननीय सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने बाजू मांडण्यात कमी पडलेल्या राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करून मराठा समाजाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा रस्त्यावर उतरून हातात रुमणे घेऊन तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला.यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढगे छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील हिवराळे संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष योगेश पाटील मोरे कैलास पाटील ऊमरे भाजपा जिल्हा सरचिटणीस बालाजी पाटील ढगे आदीसह मराठा बांधव उपस्थित होते
    —–
    मराठा समाजातील नेते समाजाला कीती भुलथापा देणार…? निकालाअंती निराशा आली अन् राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करायला चालु केली.
    एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा कुठे कमी पडलो आणी पुढ काय कराव याचा निर्णय घ्यावा.
    – बालाजी पाटील ढगे
    जिल्हाध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना
    — —
    मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कित्येकांचे आयुष्य बरबाद झाले तरीसुद्धा समाजातील धनदांडगे व राजकीय लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत हे जर खरच मराठा समाजाचे असतील तर ज्यांना कुठल्यातरी राजकीय दबावामुळे बोलता येत नसेल तर थेट राजीनामे देवुन मोकळं व्हाव
    – राजेश पाटील मोरे
    प्रदेशाध्यक्ष छावा युवा संघटना
    — – —
    सर्वप्रथम सर्व राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करणे बंद कराव, मराठा आरक्षणाचा लढा साधासुधा नसुन यात तब्बल 48 बांधवांनी बलिदान दिले, लवकरात लवकर सरकारने राज्यव्यापी बैठक घेऊन मुद्दा मार्गी लावावा अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल
    -योगेश पाटील मोरे
    तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड