पाचेगाव पशुवैद्यकिय दवाखाना नावालाच

    52
    Advertisements

    ?कायमस्वरुपी वैद्यकीय अधीकारी नेमुन जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी : मोतीराम गाडे याची मागणी

    ✒️गेवराई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गेवराई(दि.6मे):- तालुक्यातील पाचेगाव येथे पशुवैद्यकिय दवाखाना नावालाच उरला आहे या ठिकाणी आसलेले पशुवैद्यकिय अधिकारी या भागात येत नसल्याने शेतकर्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाही उन्हाळा असल्याने ताप व ईतर आजाराचे लसीकर होत नाही शेळी, मेढी ,गाय म्हैश बैल जनावरांच्या आरोग्यासाठी खाजगी डाॅक्टरचा आधार घेऊन आवाचा सवा पैसे द्यावे लागत आसल्याने शेतकर्याच्या पशुधनासाठी पाचेगाव सर्कल मध्ये कायमस्वरुपी शास्कीय पशुवैद्यकिय अधिकारी कर्मचारी वेळेवर सेवा देण्यास नेमनुक करावे अशी मागणी श्री कामधेनु स्वदेशी गोशाळेचे अध्यक्ष मोतीराम गाडे साहेब यानी पञकारांशी बोलतानी केली आहे

    सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे पशुवैद्यकिय दवाखाना आहे गेल्या कित्येक वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी पाचेगाव सर्कल मध्ये काम करताना दिसत नाही पशु सेवा देत नसल्याने शेतकर्याच्या पशुधनाचे आतोनात हाल होत आहेत उन्हाळा असल्याने शेळी, मेंढी , गाय म्हैश बैल, कोंबड्या ईतर जनावराना उपचार मिळत नसल्याने लसीकरण अथवा हिवताप आजारामुळे पशुधनाचे नुकसान झाले आहे पाचेगाव येथे पशुवैद्यकिय दवाखान्यात कायमस्वरुपी पशुवैद्यकिय अधीकारी व कर्मचारी स्टाफ नेमनुक करुन सर्कलच्या पशुधनाला आरोग्य सेवा द्यावी अशी मागणी तळवट बोरगाव येथील श्री कामधेनी स्वादेशी गोशाळेचे अध्यक्ष मोतीराम गाडे यांनी केली आहे