✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)
नांदेड(दि.11मे):- जिल्ह्यातील कंधार तहसील अंतर्गत वहाद सज्जा ला अनेक तलाठी यांनी पदभार स्वीकारला,अनेकांनी जनसामान्यांची कामेही केली.परंतु आताचे लाभलेले वहाद सज्जा चे तलाठी रामदास दुधाटे यांच्या कार्यशैलीची प्रसंशा सर्वत्र होत आहे.कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे येणारा प्रत्येक जनसामान्य माणुसमोठया अपेक्षेने येतो. त्याच्या अपेक्षा तडा जाऊ नये म्हणून अटीतटीत शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचे काम मार्गी लावण्यात तलाठी साहेब यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरत आहे. नोकरीसाठी सर्वच काम करतात.पण वहाद सज्जाचे तलाठी माणुसकी वर्ती धरून केवळ आशीर्वाद प्राप्तीसाठी गोरगरिबांची कामे करताना पाहायला मिळत आहे.
कधी कोणतेच काम तलाठी रामदास दुधाटे यांनी अपूर्ण ठेवले नाहीत.सर्व कामे पूर्णत्वाचे मार्गी लावले आहेत. असे अभ्यासू,कुशल,बुद्धिमान,निर्भिड, कर्तव्यदक्ष व अनुभवी तलाठी आज पर्यंत वहाद सज्जाला लाभले नसावे. वहाद सज्जाच्या अंतर्गत मोहिजा ,परांडा, हणमंत वाडी गावाचा समावेश येतो गावकरांच्या हाकेची साथ वहाद सज्जाचे तलाठी रामदास दुधाटे साहेब असल्याने जनसामान्यांची कामे तात्काळ होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा व त्यांची कार्यप्रणाली ही नायक भूमिकेत ठरली आहे. त्यांच्या शासकीय कामकाजात बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांनी केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांचे नाव सांगून काही स्थानिक नेत्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अनेक वेळा अपमानही केला पण महा 24 न्यूज चे तालुका प्रतिनिधी माधव पाटील वळसंगे या तक्रारीची वैयक्तिक चौकशी केली असता त्यामधून वास्तव हे समोर आले ते म्हणजे या राजकीय पुढारी आपली स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच बरोबर साहेबां चे सामाजिक कार्याची वाटचाल उधान जोमाने असल्याने वहाद सज्जा समवेत तालुक्यात त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिले आहेत.वहाद सज्जा तलाठी म्हणून रामदास दुधाटे साहेबानी अनेक गोरगरीबाची कामे करून दिली परंतु कुठेही गालबोट लागेल व शासनाचे नाव मलीन होईल.
असे कोणतेही कृत्य केले नाही.क्रिया आणि क्रियापद क्रियासीलतेवर आधारीत असते तसेच रामदास दुधाटे साहेबांचे पारदर्शककाम शासकीय नियमाने स्वच्छ व परवड आहे.कारण त्यांच्याकडेयेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आश्वासन नव्हे तर कार्यसिद्धी प्राप्ती होते.त्यामुळे वहाद सज्जाचे तलाठी रामदास दुधाटे याना मानाचे मान मिळतअसल्याने ते नावलौकिक ठरले आहे.अशा रामदास दुधाटें च्या कार्यप्रणालीला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.