पुसद येथे ॲड.बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्य रूग्णांना फळे व अल्पोपहार वाटप

    48
    Advertisements

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.11मे):-वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष , बहुजन हृदय सम्राट मा.खासदार श्रध्येय ॲड .प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्त वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका कमिटी व शहर कमिटी तर्फे रूग्णांना नारळ पाणी , साहित्य,व अल्पोपहार वाटप करून साजरा करण्यात आला.

    ॲड .बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त कमिटीकडून स्थानिय उपजिल्हा रुग्णालय येथे रूग्णांना नारळ पाणी वाटप व साहित्य भेट देण्यात आले.

    तसेच कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना पुसद येतील वंचित बहुजन आघाडी शहर व तालुका कार्यकारणीच्या वतीने अल्पोपहाराचे आयोजन करून बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

    यावेळी बुद्धारत्न भालेराव पुसद तालुकाध्यक्ष, शेख मुख्तार शेख निजाम शहराध्यक्ष, राजकुमार तालिकुटे जिल्हा संघटक, डॉ.मोसीन खान, मस्के सर, दीपक पदमे, सन्नी पाईकराव, प्रसाद खंदारे, दिलीप तालिकुटे, भीमराव कांबळे, जनक कोल्हे, शेख आयाज, गोविंद काळे, विकास कोल्हे,विठ्ठल तालिकुटे, विशाल डाके, विपुल भवरे,प्रणव भागवत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.