✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,तालुका)मोबा.9075686100
म्हसवड(दि.22मे):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा शाखेच्या वतीने बॉम्ब रेस्टाँरन्ट चौकामध्ये वास्तव्यास परप्रांतीय आहेत या परप्रांतीयांना रेशनिंग कार्ड आहे ना शासनाच्या कुठल्याही मोफत योजना मिळण्याचा आधार अशा वेळेस रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून प्रत्येक परप्रांतीयांच्या कुटुंबासह सातारा तालुक्यात कॅनाल कृष्णानगर परिसरात असणारे फासेपारधी व अजंठा चौक येथे असणाऱ्या गोपाळ समाजाच्या लोकांना गहू तांदळाचे वाटप करण्यात आले यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक नवीन पर्व दादांसाहेबांनी सुरू करून कार्यकर्त्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे,असे प्रतिपादन अनिल वीर सर यानी केलं.
जे परप्रांतीय राजस्थान, गुजरात मधून मूर्ती व्यवसाय करण्यासाठी आलेत ,आपल्याला गणेशमूर्ती,दुर्गादेवी मूर्ती व इतर शोभेच्या वस्तू तयार करून देतात पण या लोकांच्याकडे स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन संपूर्णता बंद आहे अशा वेळेस त्यांच्याकडे आधार कार्ड किंवा रेशनिग कार्ड नसल्याने व रेशनिग देण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते ओळखून ओव्हाळ यांनी खऱ्या अर्थानं वंचितांना व पीडितांना आपल्या पक्षाच्या वतीने सहकार्य करण्यात आले कँनाल कृष्णानगर वरील फाशेपारधी यांची सुद्धा अवस्था अशीच आहे त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं पोटपाणी भरण्यात साधन नाही अन्नधान्यासाठी भटकावे लागत आहे, त्याच प्रमाणे अजंठा चौक येथे असणाऱ्या गोपाळ समाजामध्ये ज्यांचा कागद प्लास्टिक वेचण्याचा व्यवसाय आहे,उदरनिर्वाहचे साधन आहे ते सुद्धा या कोरोणा काळात पूर्ण बंद आहे,त्यामुळे हेच ओळखून दादासाहेब ओव्हाळ यानी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे.
या लोकांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डाळ खिचडी आणि बिर्याणी वाटप करन्याचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ रिपब्लिकन युवक कार्याध्यक्ष विक्रम वाघमारे युवक उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे शहराध्यक्ष जयवंत कांबळे अनिल बीर हौसेराव धुमाळ अँड वाहगावकर इत्यादी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले ,आणि याच वेळी शहराध्यक्ष जयवंत कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं आभाराचे काम केलं सिद्धार्थ सविंदर बाबा ओव्हाळ राम मदळे अतुल कांबळे किशोर इंगळे विजय ओहाळ शांताराम उदागे इत्यादी कार्यकर्तेनी परिश्रम घेतले.