चंद्रपूर जिल्ह्यात (दि.3जून) रोजी 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 कोरोना पॉझिटिव्ह तर 5 कोरोना बाधितांचा मृत्यू

    43
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.3जून):- गत 24 तासात जिल्ह्यात 342 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 177 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

    आज (दि.3) एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 54, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 28, भद्रावती 27, ब्रम्हपुरी 3, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 9, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 4, राजूरा 8, चिमूर 2, वरोरा 5, कोरपना 6, जिवती 5 व इतर ठिकाणच्या 3 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील 43 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील नेताजी नगर येथील 57 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील 59 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 228 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 79 हजार 813 झाली आहे. सध्या 1 हजार 945 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 79 हजार 12 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 93 हजार 89 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1470 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1361, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

    प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

    ?गडचिरोली जिल्ह्यात 141 कोरोनामुक्त, 1 मृत्यूसह 38 नवीन कोरोना बाधित

    गडचिरोली(दि.3जून):-आज जिल्हयात 38 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 141 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29503 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28193 वर पोहचली. तसेच सद्या 587 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 723 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 1 नवीन मृत्यूमध्ये 80 वर्षीय महिला कमलापूर ता. अहेरी , यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.99 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

    नवीन 38 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 04, भामरागड तालुक्यातील 02, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 062, एटापल्ली तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 08, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 07 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 141 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 37, अहेरी 25, आरमोरी 05, भामरागड 00, चामोर्शी 30, धानोरा 06, एटापल्ली 09, मुलचेरा 07, सिरोंचा 11, कोरची 02, कुरखेडा 05 तसेच वडसा येथील 04जणांचा समावेश आहे.

    ****

    म्यूकर मायकोसिस च्या 7 रूग्णांचे निदान

    एकजणाने केली मात, 4 उपचाराधीन तर दोन मृत्यू

    जिल्हयातील संशियित म्यूकर मायकोसिस 4 रूग्ण नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. तसेच इतर तीन जण चंद्रपूर येथे येथे उपचार घेत होते. त्यांचे तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना त्या त्या ठिकाणी उपचार सुरू होते. त्यातील 58 वर्षीय गडचिरोली शहरातील एकजणाने म्यूकर मायकोसिस वर मात केली. दोन चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर दोनजण नागपूर येथे उपचार घेत आहेत. दोन मृत्यूंमध्ये कोरची येथील 50 वर्षीय पुरूष व चामोर्शी तालुक्यातील 73 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.