हणेगाव पञकार ‌संघटनेच्या वतीने लोकपञ चे संपादक रविंद्र तहकीक यांना झालेल्या मारहाणीचा निषेध

    44

    ✒️देगलूर प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

    हणेगाव(दि.३जून):- परवाच दिनांक-३१ मे २०२१ रोजी दैनिक लोकपञ या वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकिक यांना झालेल्या औरंगाबाद येथील मारहाणीचे निषेध सर्व राज्यात होत असून रवींद्र तहकीक यांनी लिहिलेल्या नारायण राणे यांच्या विरोधातील वक्तव्य लिहिल्यामुळे राणेसमर्थक औरंगाबाद येथे लोकपत्र या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये जाऊन रवींद्र तहकिक यांना मारहाण केली व त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला ही बाब निंदनीय असून पत्रकारावर होत असलेले दररोजचे हल्ले पाहता आजचा पत्रकार सुरक्षित नाही असे वाटते.

    असे झाल्यास भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळल्या शिवाय राहणार नाही. म्हणून अशा मारेकऱ्यांवर तात्काळ कारवाई केली नाही तर लोकशाही टिकून राहणार नाही म्हणून या मारहाणीचा हणेगाव पञकार ‌संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे असे निवेदन मरखेल‌ पोलिस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक आदित्य लोणीकर यांना देण्यात आले. या निवेदनावर महादेव उप्पे(अध्यक्ष माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती देगलूर), फारूख पटेल, किशोर आडेकर, प्रल्हाद नाईकवाडे, आदिजन उपस्थित होते.