सरपंच, उपसरपंच सदस्यांना ओळखपत्र द्या – आज्जूभाई सौदागर

    51

    ✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

    तलवाडा(दि.3जुन):-ग्रामपंचायत चे सरपंच ,उपसरपंच आणि सदस्य यांना शासनाने ओळखपत्र तयार करून घ्यावे जेणे करून ग्रामपंचायत चे कामासाठी किव्हा जनतेच्या मदतीसाठी कोणी ग्रामपंचायत सदस्य गेला तर त्यांची ओळख व्हावी किव्हा त्यांना ओळक द्यायची गरज पडू नये त्यासाठी त्यांना ग्रामविकास विभागा मार्फत ओळखपत्र द्यावे अशी मागणी आज्जूभाई सौदागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

    दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद सद्स्य तसेच नगरपरिषद ,नगरपालिकांच्या पदाधिकारी यांना ओळखपत्र दिले जाते तसेच ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच त्याच बरोबर सदस्यांना ओळखपत्र असावे ही मागणी अनेक दिवसा पासून करत असून मागील काळात तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याकडे ही मागणी केली असल्याचे सौदागर यांनी नमूद केले असून जनतेच्या विकासकामा बाबत अनेक वेळा विविध ठिकाणी सरपंच, उपसरपंच ,सदस्य यांना जावे लागते.

    त्या वेळी तोंडी सांगितल्या शिवाय पर्याय राहत नाही कधी कधी गावातील रुग्ण तालुकायच्या ,जिल्ह्याच्या ठिकाणी तर पुणे,मुंबई या सारख्या ठिकाणी घेऊ जावे लागतात त्या वेळेस रस्त्याने व कामाच्या ठिकाणी ओळखपत्र नसल्यामुळे अडचणी येतात त्यासाठी आयकार्ड असणे खूप आवश्यक आहे,यामागणीची शासनाने दखल घ्यावी व ग्रामविकास विभागामार्फत सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत चे सदस्य यांना ओळखपत्र द्यावे अशी मागणी तलवाडा ग्रामपंचायत चे उपसरपंच आज्जूभाई सौदागर यांनी केली आहे.