खामगाव वाहतूक पोलिसांचा छळण्याचा नवीन फंडा

    69
    Advertisements

    ?वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढून नाहक गंडवितात

    ✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

    खामगाव(दि.18जून):- लाँकडाऊनच्या काळात मातब्बरांना मुभा देऊन आम आदमी, शेतकरी, किरकोळ व्यावसायिक, दुचाकी वाहनधारक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत पोलिसांनी त्यांचा कसा छळ केला, याबाबतचे वृत्त आतापर्यंत प्रसार माध्यमातून झळकले आहे, परंतु सध्या अनलाँकच्या काळातही हा प्रकार सुरू असून वाहतूक पोलिसांनी काही एक कारण नसताना आज एका पत्रकाराच्या दुचाकीच्या नंबरप्लेटचा फोटो काढून नाहक 200 रूपयाचा भूर्दंड दिल्याचा प्रकार घडला़ त्यामुळे अशा पोलिसांकडून सर्वसामान्यांना कशी वागणूक मिळत असेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे़
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि 16 जून रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी गणेश भेरडे हे शहर पोलिस समोरून जात होते़.

    दरम्यान पोलिस स्टेशनसमोरील गांधी बगिच्याजवळ नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांपैकी नितीन निळे ब.न. 115 यांनी काही एक कारण नसतांना मोबाईलव्दारे गणेश भेरडे यांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटचा फोटो काढून 200 रूपयाचा भुर्दंड दिला़ यावर भेरडे यांनी निळे यांना विचारणा केली असता तुम्हाला हात देऊन तुम्ही थांबले नाही असे तुटपुंजे उत्तर देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला, मात्र याचवेळी भेरडे यांनी एसडीपीओ अमोल कोळी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून झालेला प्रकार त्यांच्या कानावर टाकला असता एसडीपीओ कोळी यांनी सदर कर्मचायास कोणत्या कारणासाठी 200 रूपयांचा भुर्दंड दिला याबाबत विचारणा करण्यास सांगितले, मात्र नितीन निळे काहीही उत्तर देऊ शकले नाही, त्यामुळे पत्रकारांसोबत असा गैरप्रकार घडत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो़ तेव्हा वरिष्ठ अधिकायांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी़.

    आता यांच्यावर कारवाई होणार काय- पोलिस म्हणून कायदा हातात असताना नाहक विनाकारण दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक पोलिस नितिन निळे हे कर्तव्यावर असतानासुध्दा सार्वजनिक ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला विमल गुटखा खाताना आज दुपारी आढळून आले़ सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधित गुटखा खाऊन पिचकारी मारणे कितपत योग्य आहे, केवळ इतरांवर कारवाईचा बडगा उगारणे आणि स्वतला सर्वकाही मुभा असल्यासारखे वागणे हे कितपत योग्य आहे़ याबाबतही वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे़*