मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची देगलूर राष्ट्रवादी युवकची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

    100
    Advertisements
    ✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

    नांदेड(दि.२८जून):-स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही मुस्लिम समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे. आरक्षणाच्या दृष्टीने अनास्था दिसून येत आहे. देशात व सबंध राज्यात मुस्लिम समाजातील शैक्षणिक व आर्थिक व सामाजिक मागासलेपणा वाढलेला असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महेमुद रहेमान समितीतील स्थापना करुन मुस्लिमांच्या विविध समस्या बाबत अहवाल मागितला महेमुद रहेमान समितीने मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नौकरीत ८ टक्के आरक्षण देण्यात यावे असा अहवाल शासनास दिला.

    त्यावेळेसचे काँग्रेस सरकारने मुस्लिम समाजास शैक्षणिक व नोकरी मध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मुस्लिमांना आरक्षण देण्यास घटनात्मक व कायदेशीर अडचण नाही. मा.उच्च न्यायालयाने मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण मंजूर केले होते. परंतू भाजपा सरकारने अहवाल दाखल केला नाही. तसेच महाआघाडी सरकार देखील आपल्या संयुक्त जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले होते. तर महाआघाडी सरकारने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देऊन मुस्लिमांचा मागासलेपणा दूर करावा. नांदेड येथे एमजीएम काॅलेजमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना निवेदन देण्यात आले.
    अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पद्दमवार सावकार, तालुकाध्यक्ष अकुश देशाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आसीफ पटेल, अल्पसंख्याक तालूका अध्यक्ष मोहीय्योदीन, नगरसेवक निसार देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालूका अध्यक्ष नाना मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुमित कांबळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान, युवक तालूका उपाध्यक्ष खलील मलीक, राष्ट्रवादी चे गजू कांबळे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.