शिर्डी साई देवसंस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवसंस्थान काँग्रेसच्या ताब्यात

    63
    Advertisements

    ✒️अतुल उनवणे(जालना,विशेष प्रतिनिधी)

    जालना(दि.29जून):-महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक रात्री उशिरा मुंबईत पार पडली. यावेळी दोन्ही देवस्थानच्या विश्वस्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत चर्चेला अखेर पूर्णविराम लागला.या बैठकीमध्ये महामंडळ नियुक्त्या आणि साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत.

    वस्तुतः या दोन्ही देवसंस्थांनावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्येकी एक देवसंस्थान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे.राज्यातील सर्वात श्रीमंत देवसंस्थान असणारे शिर्डी साई देवसंस्थान आतापर्यंत १५ वर्ष काँग्रेस आघाडीच्याच ताब्यात होते पण, महाविकास आघाडीच्या काळात प्रथमच हे देवसंस्थान पवारांच्या पावर मुळे राष्ट्रवादीकडे आले आहे हे विशेष