कै.वसंतराव नाईक यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने भव्यदिव्य जयंती साजरी

    40

    ?तालुक्यातील सर्व बंजारा ताड्यांचा सर्वागिण विकास करणार – आ.बाळासाहेब आजबे

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.2जुलै):-तालुक्यात सुमारे २० गावातंर्गत हजोरांच्या संख्येने बंजारा समाज आहे,हा समाज अंत्यत कष्टाळु आहे.त्यांचे अजुनही जीवनमान उंचावले नाही.स्वातंत्र्यानंतरही या समाजाला घरे,रस्ता पाणी,लाईट मिळालेली नाही.या दुर्लक्षीत समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आमचे कर्तव्य आहे.आज या समाजातील सुशिक्षीत तरुण संघटीत होऊन जनजागृती करीत आहेत.आष्टी तालुका राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष समीर जाठोत व त्यांचे अनेक सहकारी यांनी हा जयंती सोहळा मोठ्या थाटात घेतला आहे.आपण या समाजाच्या सर्व मागण्या समजुन घेतल्या आहेत.रस्ते,पाणी,विज हे मुलभुत प्रश्न प्राधान्याने सोडविल्या जातील.आष्टी तालुक्यातील सर्व बंजारा ताड्यांचा सर्वागिण विकास करणार असल्याची घोषणा आ.बाळासाहेब आजबे यांनी केली.

    आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे संत सेवालाल महाराज मंदिरात आयोजित कृषीदिन व कै.वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्रस्ताविक राष्ट्रीय बंजारा परिषदेचे तालुकाध्यक्ष समीर जाठोत यांनी केले.त्यांनी आष्टी तालुक्यातील सर्व बंजारा समाजाच्या तांड्याच्या समस्या मांडल्या आणि या समास्या प्राधान्याने आपण आ.बाळासाहेब आजबे यांच्याकडुन सोडवुनच घेऊ असे सांगीतले.यावेळी आ.बाळासाहेब आजबे यांच्या शुभहस्ते कै.बाजीराव राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परिसरामध्ये कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.बंजारा समाजाच्यावतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आष्टी तालुक्यात कोरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

    या कार्यक्रमासाठी तहसिलदार प्रदिप पांडुळे,कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे,डॉ.प्रसाद वाघ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे,बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,परमेश्वर शेळके,हरिभाऊ दहातोंडे,परसराम मराठे,काकासाहेब शिंदे,सुनील नाथ,संतोष गुंड,नवनाथ तांदळे,महादेव डोके,राम उदमले,संजय गुंड,संदीप सुंबरे, अशोक पोकळे,नाजिम शेख,विजय दानवे,अतुल शिंदे,सुभाष वाळके,बाबासाहेब भिटे,महादेव अमृते,जालिंदर नरोडे,ताराचंद कानडे,विठ्ठल गुंड, नवनाथ राठोड,अरविंद चव्हाण,संतोष पवार,विष्णू राठोड,सुभाष राठोड,प्रकाश जाधव,सुभाष चव्हाण,अशोक राठोड यांच्यासह समाज बांधव,ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष समीर जाठोत यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश राठोड व आभार सुभाष चव्हाण यांनी मानले