गेवराईत 35 कोरोना रूग्ण तर काजळा येथे पुन्हा 18 पाँझिटीव्ह

    67
    Advertisements

    ?काजळा कोरोनाचा ठरतोय हाँटस्पाँट- गावात शंभरहून अधिक रुग्ण

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

    गेवराई(दि.8जुलै):- तालुक्यात आज कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांची संख्या 35 आली आहे. यामध्ये काजळा येथील 18 रुग्णांचा समावेश असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत वाढ झाली आहे. काल तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा हा 45 होता. यामध्ये काजळा येथील 20 रुग्णांचा समावेश होता. दरम्यान काजळा येथे दरदिवस बाधितांमध्ये वाढ होत असून घरोघरी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या इतर जिल्ह्यात कमी झालेली असताना बीडमध्ये मात्र दररोज दिडशे ते दोनशे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये गेवराई तालुक्यात गुरुवारी आकडा हा 45 होता, तर आज 35 आला आहे. यामध्ये तालुक्यातील काजळा येथील कोरोना बाधितांची आकडा मोठा असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.

    येथील नागरिकांना लग्न समारंभातून कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती असूनही या गावात कालपर्यंत शंभरहून अधिक रुग्ण असताना गुरुवारी 20 तर आज पुन्हा 18 कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने काजळा हे कोरोनाचे हाँटस्पाँट बनले आहे. याठिकाणी आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांची अँटिजन टेस्ट केली जात आहे. तरी नागरिकांनी बाधितांच्या संपर्कात तसेच लक्षणे असल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी केले आहे.