✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.8जुलै):- जिल्हा परिषद सदस्य श्री विनोद लेनगुरे यांनी आपला वाढदिवसानिमित्त आरोग्य उपकेंद्र पेंढरी व ईतर ठिकाणी वृक्षरोपण करून आपला वाढदिवस साजरा केले.
वाढते प्रदूषण आणि बदलले निसर्ग चक्र यामुळे मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होतांना दिसत आहेत. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण करण्याची गरज लक्षात घेता, आपल्या वाढदिवसानिमित्त जि. प सदस्य विनोद लेनगुरे यांनी वृक्षरोपण केले.
कोरोना काळात ऑक्सिजन म्हणजे काय हे साऱ्या जगाने अनुभवले आहे. म्हणून वृक्ष रोपण करण्याची काळाची गरज बनली आहे, असे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शनात सांगितले. या निमित्याने विनोद लेनगुरे सदस्य, जिल्हा परिषद गडचिरोली, श्रीनिवास भाऊ दुल्लमवार माजी सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली, संजय गावडे सरपंच ग्रामपंचायत कामनगड, डॉ सखाराम हीचामी वैद्यकीय अधिकारी पेंढरी, अमोल दुगा वैद्यकीय अधिकारी, डॉ निधी तिबुळे वैद्यकीय अधिकारी आरोग्य उपकेंद्र गट्टा संजय गावळे सदस्य आरोग्य सेवा समिती, सदुकर हलामी युवा कार्यकर्ते, वाघरे जी, मनीराम गावडे, निकेश दुमने जी, बोरकर जी, वासेकर जी, भालाधरे जी, सौ. अनिताताई गुरनुले व आरोग्य उपकेंद्र पेंढरी येथे रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.