प्रत्येक चांगल्या कार्यानंतर गौरव होणे म्हणजे शंभर वर्ष आनंदात जगणे:- पूज्य.श्री.म.नी.प्र. गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी

    40

    ?कर्नाटक मध्ये राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार

    ✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    कोल्हापूर(दि.16जुलै):-कर्नाटक राज्यामध्ये बेडकिहाळ येथे विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य राखून शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेकडून राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे कर्नाटकचे हत्तरगी येथील पूज्य.श्री.म.नी.प्र. गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते देशभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव पुरस्कार घेण्यात आला. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले प्रत्येक चांगल्या कार्यानंतर गौरव हा झालाच पाहिजे.

    जीवनामध्ये चांगले कार्य करून जितकी पुरस्कार तुम्ही मिळवाल इतके आयुष्य तुमचे आनंदात जाईल व शंभर वर्ष तुम्ही आनंदात जगाल समाजामध्ये विकलांग व अनादर लोकांची मदत करा आपल्या आपल्या क्षेत्रातून समाजामध्ये चांगली कार्य कराल तर अनेक संस्थेकडून आपल्या कार्याचा गौरव पुरस्कार होईल. असे शुभाशीर्वाद व उद्देश स्वामीजींनी सर्वांना उद्देशून उद्गारले.

    यावेळी विशेष पुरस्कार दत्तात्रय पाटील(उद्योजक भूषण),डॉ.सुमित्रा भोसले (समाजरत्न), जितेंद्र यशवंत (उद्योगरत्न), नितीनकुमार तिवाटने(आरोग्यदूत), सुरेश राठोड (आदर्श संपादक), बाळासाहेब खोत (उद्योगरत्न) व राजाराम चौगुले (आदर्श पत्रकार), माणुसकी फौंडेशन इचलकरंजी याच बरोबर कर्नाटक ,महाराष्ट्र व अनेक राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर लोकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार पूज्य.श्री.म.नी.प्र. गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व मान्यवरांचे देशभरातून अति उत्साहात शुभेच्छांच्या बरोबर कौतुक होत आहे.