✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)
नांदेड(दि.22जुलै):- नायगाव तालुक्यातील कुष्णूर एमाडिसी येथील फ्लेमिंगो फार्मासिटीकल येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची दखल न घेतल्यामुळे औरंगाबाद येथील फ्लेमिंगो फार्मासिटीकल लि.कुष्णूर. एम आय डि सी कंपनीत औरंगाबाद मजदुर युनियन ची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या फलकाचे अनावरण हे आजचे प्रमुख पाहुणे मा.आमदार मोहन अण्णा हंबर्डे व शिवराज पाटील होटाळकर सरचिटणीस भा. ज. पा. नांदेड मा. सभापती जि प. नांदेड याच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थितीत ,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मा.माधव पा. देवसरकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष मा.तिरुपती पा.भगणुरकर,मा.सुनिल कदम,शिवविख्याते सोपान पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामदास कांबळे व औरंगाबाद म.युनियन चे जिल्हा सेक्रेटरी मा.कॉ.अजय उध्दव भवलकर मा.कॉ.राठोड मा.कॉ.ननुरे व सिट्रस कंपनीतील कॉ.गणपत मुंडकर, कॉ.संतोष पाटील सातेगांवकर,गोदावरी ड्रग्स कंपनीतील कॉ.पपुलवाड आणि म.रा.पायोनिअर डिस्टलरिज कामगार संघ, सलग्नं सीटू चे कॉ.पवार वाय बी., कॉ.रामलू बाळापुरकर, कॉ.जी. शिवप्पा,कॉ.एम.जी.शिंदे, कॉ.डि.बी.शिंदे.फ्लेमिंगो फार्मा चे युनिट अध्यक्ष दीपक रुईकर, सचिन लबडे, विष्णू कातोरे, शुभम देवसकर, देवानंद शेळगाव, तानाजी सूर्यवंशी, स्वप्निल हंबर्डे व पंडित जाधव.
औरंगाबाद म.युनियन चे जिल्हा सेक्रेटरी मा.कॉ.अजय उध्दव भवलकर मा.कॉ.राठोड मा.कॉ.ननुरे व सिट्रस कंपनीतील कॉ.गणपत मुंडकर, कॉ.संतोष पाटील सातेगांवकर ,गोदावरी ड्रग्स चे साहेबराव पपुलवार व फ्लेमिंगो कंपनीतील संघटना पदाधिकारी व सर्व कामगार उपस्थितीत होते.
मान्यवरांनी संघटना मजबुती बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.आणि अडचणीच्या काळात सर्व संघटना कामगारांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहू.असे सांगितले आहे…. नांदेड जिल्ह्यात सीटू परिवारात फ्लेमिंगो फार्मासिटीकल सर्व कामगारांचे स्वागत व भविष्यातील कामगारांच्या अधिकार लढ्यास शुभेच्छा. सीटू परिवार सदैव तुमच्या पाठीशी राहिल.