पशुवैद्यकांचे विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन

    44

    ?पशुपालकांची होणार गैरसोय

    ✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो.9823995466

    उमरखेड(दि.2ऑगस्ट):– राज्यात शासन जिल्हा परिषद सेवेत पशुधन पर्यवेक्षक, विकास अधिकारी यासह गट – ब संवर्गाचे जवळपास 4500 कर्मचारी असून तब्बल 2853 पशुवैद्यकीय दवाखान्याचे संस्था प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या जवळपास पंधरा वर्षांपासून प्रलंबित असून या मागण्या सोडविण्याच्या संदर्भात संस्थेने वेळोवेळी निवेदने व चर्चेच्या माध्यमातून शासनास विनंती केली.

    परंतु आजपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे दि 2 ऑगस्ट 2021 पासून पंचायत समिती समोर पशुवैद्यकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे मात्र तालुक्यातील पशुधन पालकांची गैरसोय होणार आहे.

    संघटनेच्या विविध मागण्या करिता मागील दीड महिन्यापासून संघटनेने विविध प्रकारचे आंदोलन सुरू केले असून 15 जून पासून लसीकरण व सर्व प्रकारचे अहवाल बंद आंदोलन , 25 जून पासून राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना आपल्या मागण्या बाबत निवेदन सादर करणे आणि 16 जुलैपासून कायद्यानुसार काम बंद आंदोलन संघटनेने करणे सुरू केले आहे तरीदेखील आजपर्यंत शासनाने कोणतेही निर्देश दिले नसल्याने आज 2 ऑगस्ट पासून राज्यातील पदविका प्रमाणपत्र धारक पशुवैद्यकांच्या मागण्याबाबत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

    भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 मधील सर्व तरतुदीचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करण्यात यावे किंवा प्रमाणपत्र/पदविका धारकांना स्वतंत्रपणे पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याची अनुमती प्रदान करावी, पशुधन पर्यवेक्षक यांची मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी या मागण्यासाठी आजपासून हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

    तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी या संपामध्ये सामील झाल्यामुळे पशुधन पालकांना मात्र हेळसांड सहन करावी लागणार आहे.