लिंबगव्हाण येथे कोवीड लसीकरण शिबीर संपन्न

    44

    ✒️ सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

    उमरखेड(दि.5ऑगस्ट):-तालुक्यातील लिंबगव्हाण गावामध्ये आज दि.५/०८/२०२१ रोजी लिंबगव्हाण येथे कोवीड लसीकरण शिबीर मा. डॉ. रावते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले होते.

    त्यामध्ये गावचे मा. उपसरपंच तथा ग्रा.प.सदस्य राजीव खंदारे लिंबगव्हाण यांना पहिली कोवॅक्सीनची लस देऊन लसीकरणाला सुरवात करण्यात आली.मा. राजीव खंदारे यांनी सर्व गावकऱ्याना कोवॅक्सीन अंत्यत सुरक्षीत असुन ती घेण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

    यावेळी गावचे मा.सरपंच यांचे पती मा. अशोकराव शिंदे सर, मा. विलास खंदारे (पोलीस पाटील), मा. सरपंच पाडुरंग पाटील खापरे, अमोल वानखेडे,संतोष माकोणे,
    संदिप माकोणे, मा. पळसकर सर (मुख्यध्यापक जि.प. प्रा. शाळा) व गावातील नागरिक हरि ससाने, काशीनाथ खापरे, गजानन वानखेडे, बाळासाहेब खापरे, गंगाधर ससाने, मारोती लाबटिळे, रामा ससाने,नरेंद्र काळे विक्रम खापरे, परमेश्वर खापरे, भिमराव खंदारे, तातेराव खापरे, सुशिल खंदारे, विश्वंभर खापरे. पिंटु ससाने,नाथा ससाने इत्यादीच्या उपस्थित कोवीड लसीकरण शिबीर संपन्न करण्यात आले.

    “कोवीड लसीकरण शिबीरात एकूण 59 लोकांनी लस घेऊन सहभाग नोंदवला”.आरोग्य विभागाचे अधिकारी मा.डॉ.रावते साहेब, रुबी मॅडम, रोकडे मॅडम व गावातील आशा वर्कस इत्यादीच्या उपस्थितीत लसीकरण पार पडले.