?मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम
✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.6ऑगस्ट):-तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवार दि.५ ऑगस्ट रोजी माजी आमदार तथा शिक्षणमहर्षी भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती शारदा दळवी व अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
गुरुवार दि.५ ऑगस्ट रोजी महाविद्यालय परिसरात तहसीलदार श्रीम.शारदा दळवी,सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय आमटे,प्राचार्य डॉ कैलास वायभासे यांच्या शुभहस्ते ३ हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले असून पूरग्रस्तांना ही ५० हजार रुपयांची यावेळी मदत करण्यात आली.तसेच बारावी बोर्ड परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ.उस्मानखान पठाण,माजी प्राचार्य रावसाहेब गुंड,प्रा.निसार शेख,डॉ.सुभाष नागरगोजे,प्रा.ज्ञानेश्वर आम्रीत,प्रा.डॉ.संजय झांजे,प्रा.राजू शेलार,प्रा.गहिनीनाथ एकशिंगे,डॉ.रमेश खिळदकर,प्रा.विवेक महाजन,प्रा.अमर शेख,प्रा.रत्नमाला तरटे आदी उपस्थित होते.