?आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्शदपूर ग्रामपंचायत अंतर्गत होतोय विकास
✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.7ऑगस्ट):-मुर्शदपुर-कासारी-शिदेवाडी ग्रामपंचायतअंतर्गत शिदेवाडी या गावातील दरेकरवस्तीवर अनेक वर्षांपासून जाण्यासाठी रस्ता नव्हता.या रस्त्याबाबत अनेकदा प्रशासनाकडे मागणी करूनही हा रस्ता होत नव्हता.अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचा प्रश्न आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अतुल कोठुळे यांनी काम पूर्ण करून मिटवला असल्याने शिदेवाडी येथीला ग्रामस्थांनी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले आहेत.
आ.सुरेश धस यांच्या ताब्यात मुर्शदपुर-कासारी-शिदेवाडी ही ग्रामपंचायत आल्यापासून अनेक प्रलंबित प्रश्न आ.धस यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अतुल कोठुळे यांनी मार्गी लावले असून त्यांच्या कामावर नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.शिदेवस्ती रस्त्याच्या कामाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून काम पूर्ण करून गावातील ग्रामस्थांना येणे-जाणे व शेतीतील कामे करण्यासाठी सुलभ झाला आहे.गावातील अनेक प्रश्न मार्गी लागल्याने सरपंच हा कामाचा माणूस आहे असे गावकऱ्यांना वाटू लागले आहे.
तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची तसेच नळ योजनेचे प्रश्न व्यवस्थितरित्या मिटवले आहेत.सार्वजनिक विहिरीवरील विजेचा प्रश्न,नदी खोलीकरण,वृक्ष लागवड,कोरोना रोखण्यास गावात कॅम्प इत्यादी कामे पूर्णत्वास चालली आहेत.गावातील ग्रामस्थांना वाटू लागले आहे की,आमदार सुरेश धस यांनी योग्य सरपंच निवडल्याने गावातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.सरपंच अतुल कोठुळे,उपसरपंच सागर धोंडे,ग्रामसेवक बाळासाहेब थोरवे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत.