पुसद येथे एक दिवशीय रानभाज्या, रानफळे, व औषधी वनस्पती महोत्सव संपन्न

    68

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.10ऑगस्ट):-जागतिक आदिवासी दिनाचे निमित्य साधून दिनांक १० ऑगस्ट रोजी पुसद येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,आत्मा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह,पुसद येथे एक दिवसीय रानभाज्या, रानफळे व औषधी वनस्पती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री .सावनकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक,तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, श्री अर्जुन हगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    रानभाजी महोत्सवामध्ये तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. रानभाज्या, रानफळे, औषधी वनस्पती यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. त्यामध्ये करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, घोळ, अंबाडी,भोकरण, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा, आवळा , तरोटा, फांद भाजी, मायाळू, गवती चहा,रान ओवा, केना, कवठ, राजगिरा, करवंद, रान तुळस, गुळवेल, हडसन, अंबाडी,सुरणकंद, आंबटचुका, वाघाटे, माठ, बांबूचे कोंब, अळू, पुदिना अशा एकूण 35 प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता.

    मानवी आरोग्यमध्ये सकस आहारास अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्त्व व त्याचे गुणधर्म ई. माहिती सर्वसामान्य व शहरी भागातील नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पुसद शहरासह परिसरातील नागरिकांनी रानभाजी महोत्सवास भेट देऊन रानभाज्यांविषयी माहिती जाणून घेतली.

    यावेळी रोटरी क्लबचे डॉ. जयानंद वाढवे, डॉ. विश्वास डांगे डॉ. उत्तम खांबाळकर, तंत्र अधिकारी एस आर धुळधुळे,मंडळ कृषी अधिकारी बि डी चेके, ए के वडकुते, एन एस राठोड,पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड,आत्माचे बीटीएम एस डी मोरे, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, बाळु पुलाते,शेतकरी मित्र व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.