शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रु.सुपूर्द

    46
    Advertisements

    ?राज्यातील दिव्यांग कर्मचारी बांधवांनी जोपासली “सामाजिक बांधिलकी”

    ✒️बीड,विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    बीड(दि.12ऑगस्ट):-कोरोना विरुध्दची लढाई शासन,प्रशासन,सर्व यंत्रणा,सामाजिक संघटना,दानशूर व्यक्ती आपल्या परीने लढत आहेत.या लढाईत प्रत्येक सुजाण नागरिक आपापल्या परीने शासनास मदत करीत आहेत.याच अनुषंगाने शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई – ३२ या दिव्यांग कर्मचारी क्षेत्रात राज्यभरात काम करीत असलेल्या आदर्श संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मंगळवार दिनांक १० आँगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे तब्बल पाच लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील व राज्यसचिव परमेश्वर बाबर यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला आहे.अशी माहिती शासनमान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.

    कोविड विषाणुच्या प्रादुर्भावावर राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था,उद्योजक,धार्मिक स्थळे स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत,मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत,करू इच्छित आहेत.केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई – ३२ यांनी कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांची मदत दिली आहे.महाराष्ट्र राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येते आहेत.महाराष्ट्रात सरकारनं कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विशेष सहाय्यता निधी निर्माण केलाय.सामाजिक दायित्वाच्या भावनेतून ही मदत करण्यात आलेली आहे.

    शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई – ३२ या संघटनेने राज्यभरातील सभासद बंधू – भगिनींना कोविड -१९ साठी सामाजिक बांधिलकी म्हणून फुल ना फुलाची पाकळी याप्रमाणे निधी देण्यात यावा असे आवाहन केले होते.याच संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील दिव्यांग कर्मचारी बंधू – भगिनींनी मोठ्या प्रमाणात संघटनेच्या खात्यावर निधी जमा केलेला होता.तब्बल पाच लाख रुपये निधी जमा झालेला होता.त्या निधीचा विनियोग म्हणून समाजा पुढे दिव्यांगांचा एक आदर्श निर्माण करण्याच्या उदात्त भावनेने व हम भी कुछ कम नही या प्रेरणेने तसेच दिव्यांग कायद्यानुसर आम्ही फक्त घेणारेच नसुन समाजाप्रती काही देणे लागतो याप्रमाणे जमा झालेला निधी सुमारे पाच लाख रुपये मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कोरोना नियमाचे पालन करुन दिव्यांग कर्मचारी संघटनेचे कर्तव्यदक्ष राज्याध्यक्ष रविंद्र पाटील व मार्गदर्शक राज्यसचिव परमेश्वर बाबर या दोघांच्या उपस्थितीत मा.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे धनादेशाद्वारे देण्यात आलेला आहे.असेही शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.
    ———————————————-
    आम्ही फक्त घेणारेच नाहीत तर देणारे सुद्धा आहोत
    राज्यभरातील दिव्यांग कर्मचारी बांधवांनी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळेच तब्बल पाच लाख रुपयांचा निधी गोळा झाला.त्याबद्दल राज्यभरातील सर्व दिव्यांग बांधवांचे मनस्वी आभार तसेच दिव्यांग कर्मचारी बांधव हे नुसते दिव्यांग कायद्यान्वये योजना घेणारेच नसुन शासनाच्या कोणत्याही संकटात तन,मन व धनाने योगदान देणारे आहेत हे आज दिव्यांग कर्मचारी संघटनेने दाखवून दिले आहे.
    रविंद्र पाटील
    राज्याध्यक्ष – दिव्यांग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य
    ———————————————-
    सामाजिक बांधिलकी म्हणून हा निधी शासनास सुपूर्द
    दिव्यांग कर्मचारी यांना सुद्धा भावना आहेत.समाजाने त्यांच्याकडील पाहण्याचा दृष्टिकोन आता खऱ्याअर्थाने बदलला पाहिजे.कारण आता दिव्यांग सुद्धा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत.त्यांच्यामधील न्यूनगंड नाहीसा होवून ते समाजाप्रती चांगल्या प्रकारे योगदान देत आहेत.मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अत्यंत कमी प्रमाणात शासकीय नोकरीत आसणाऱ्या दिव्यांग कर्मचारी बांधवांनी एवढा मोठा निधी जमा केला त्यांचा मला सार्थ अभिमान आहे.हा निधी सामाजिक बांधिलकी म्हणून मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धनादेशाद्वारे देण्यात आलेला आहे.
    परमेश्वर बाबर
    राज्यसचिव – दिव्यांग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य