?बँक ग्राहकास योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहेत
✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)
वर्धा/ समुद्रपूर(दि.12अगस्त):-समुद्रपूर येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखेला अनेक दिवसांपासून व्यवस्थापक नाही. त्यामुळे शाखेतील अधिकारी बेशिस्त झाले आहे. बँक ग्राहकास योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहेत. सोमवारला समुद्रपूर येथील जैन सिमेंटचे वीरेंद्र सिसोदिया यांनी मुलीला पैसे भरण्यासाठी पाठविले. बँक अधिकाऱ्याने पैसे स्वीकारले पण स्टॅम्प मारण्यासाठी किती वेळ लागेल ? अशी अनेकदा विचारणा केली. परंतु, संबंधित अधिकारी मात्र खासगी कामातच मशगूल असल्याचे दिसून आले. त्या मुलीला लाइनमध्येच चक्कर आल्याने ती जागेवारच खाली बसून गेली. तरीही दांडगे नामक अधिकाऱ्याला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून आले.
यामुळे वीरेंद्र सिसोदिया यांनी याबाबत विचारणा केली असता तुमची मुलगी खोटी बोलत असल्याचे सांगितले. त्याचवेळी सिसोदिया यांनी सीसीटीव्ही कॅमेरा पहा म्हणताच अधिकारी गप्प झाला. वयोवृध्द खातेदार शिल्लक विचारताच त्यांना सुद्ध समर्पक उत्तर दिले जात नाही. कारण या शाखेतील व्यवस्थापकाची बदली होऊन अनेक दिवस झाले. पण, नवीन व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने या शाखेतील अधिकारी मगरूर झाले आहे. त्यावर वरिष्ठांनी योग्य कारवाई करावी, अशी मागणी सिसोदिया यांनी केली आहे.