सकरुबा निमित्त पिंपळा येथे कुस्त्यांचा हंगामा संपन्न

    40

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.17ऑगस्ट);-श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी.नागपंचमीपासून सण-उत्सवांची सुरुवात होते.केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.त्यांचबरोबर ग्रामीण भागात सकरुबा निमित्त मिरवणूक व कुस्त्याच्या जंगी हगामा भरवण्यात येतो पण यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांना नियमांचे पालन करून  पिंपळा गावाचे ग्रामदैवत श्री.पिंपळेश्वर महाराज व सय्यद हसन साहेब महाराज यांच्या चरणी श्रीफळ वाहून वरुणरजा बरसण्यासाठी साकडं घालण्यात आले व छोटाशा कुस्तीचा हंगामा भरण्यात आल्या.

    यावेळी उपस्थित.राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब भिटे,प्रा.दादा विधाते सर,कृषी अधिकारी शिवाजी सुंबे साहेब,प्रा.सोनवणे सर,चंद्रकांत अरुण,बाबासाहेब शेटे,संपत लोखंडे,गोरख लोखंडे,अंबिर भाई सय्यद,दत्तू सरोदे,आंबादास अरुण,समाधान अरुण,दादा लोखंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.