एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करा – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

    52
    Advertisements

    ✒️समाधान गायकवाड(नायगांव प्रतिनिधी)

    नायगांव बाजार(ता. १२नोव्हेंबर):-गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील सर्व एस.टी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे यासाठी संप,उपोषण,जागरण आंदोलन चालू आहे, चाळीस पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तरीही देखील सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यातील राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी एस.टी मंडळाला शासनामध्ये विलीन करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत थेट राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे केली आहे, निवेदनात असे म्हटले की एस.टी कर्मचाऱ्यांनी जनहिताची मागणी घेऊन आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने बघावे म्हणून विविध स्तरातून आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे.

    जनता या आंदोलनात सामील होत आहे. एस.टी ही महाराष्ट्राच्या विकासाची पायाभूत सुविधा आहे. एस.टी मुळेच बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवता आला. आदिवासी खेड्यापाड्यापर्यंत एस.टी पोहचल्याने दळणवळण सोपे झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच शिक्षण संस्था एस.टी मुळेच सुरू आहेत एम. आय. डी. सी. छोटे व्यवसायिक, बाजार, नोकरदार, एस.टी मुळेच चांगले जीवन जगतात त्यामुळे गांव तिथ एस.टी मुळे महाराष्ट्राच्या विकासात भर पडली. तरी कर्मचाऱ्यांना निलंबित करून आंदोलन चिघळवण्यापेक्षा मागणी सोडण्यासाठी गांभीर्याने विचार केल्यास महाराष्ट्राचे भले होऊन प्रजाहितदक्ष म्हणून सरकारची नोंद होईल. या आंदोलनाला शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांचा सक्रिय पाठिंबा आहे. असे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते – पांचाळ यांनी मुख्यमंत्र्याकडे दिले आहेत,