✒️लेखिका- सौ.सिंधू महेंद्र मोटघरे,
महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या जहागीरदार घाडगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई या दोन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजीराजांच्या अकाली निधनानंतर ते 17 मार्च 1974 रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. ते फ्रेजर व रघुनाथराव सपनिस यासारखे गुरु त्यांना मिळाले . विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृती, इतिहास राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला. सन 1891 मध्ये बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्या बरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (अक्कासाहेब), आऊबाई या दोन कन्या झाल्या.
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्याचे दारिद्र्य, अज्ञान ,अंधश्रद्धा नष्ट होणार नाही हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या संस्था प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी 1917 झाली आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाच्या कायदा केला आणि तो अमलात आणला .प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली .प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.अस्पृश्यासाठी शिक्षणाचे दार उघडले.गोरगरीबांना न्याय मिळवून दिला.
शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपुर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना राजर्षी पदवी बहाल केली (1919).त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक,रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली.या राज्याने अज्ञानी बहुजन समाजाला करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने खचून गेले. तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबईत त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या नन्तर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.
काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या या महामानवाने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही, हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरणे आखून अमलात आणली.
-सौ.सिंधू महेंद्र मोटघरे,
पदवीधर शिक्षिका ,जि. प. व. प्रा. शाळा तुमखेडा बु.,ता.गोरेगाव,जी. गोंदिया