✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.20सप्टेंबर):- परिसरात सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कामाची स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या सामाजिक कार्यकर्त्या तथा सुश आसरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. पायल विवेक कापसे यांना माहेर कट्टा व्यासपीठाचा राज्यस्तरीय “वूमन अचिव्हर्स अवाँर्ड २०२२” नुकताच नागपुर येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
चिमूर तालुक्यातील नवेगाव पेठ ग्रामपंचायतच्या माजी सदस्य सौ. पायल विवेक कापसे यांना माधव बाग व संस्कृती मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने नागपुर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते अवाँर्ड प्रदान करण्यात आला.
पायल कापसे ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारण व सुश आसरा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात सक्रीय आहेत. सामाजिक बांधिलकी व सामाजिक ऋणाची परतफेड करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या चंद्रपूर जिल्हा क्षत्रिय कुर्मी समाजच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
त्यांना अवाँर्ड प्राप्त झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व अन्य रचनात्मक कामात सक्रीय असणा-या अनेक मान्यवरांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.