संतान सांभाळत नाही.लोभ सुटत नाही

    65
    Advertisements

    एकदा जावई सासरच्या अंगणात उभा होता.जावईबापूला एकवचनी लिहीले तरीही अवमानना केली,असे समजू नका.एक केळी विक्रेता आला.जावईने केळी घेतली.तेथेच सोलून खाल्ली.सोलून शब्दात अश्लील अर्थ शोधू नका.सालटी काढणे आवश्यक असते.किमान सासरवाडीली असतांना तरी.केळी खाऊन जावईबापूने सालटी अंगणात फेकली.सासरेबुवांनी पाहिली.वयस्कर म्हणून मान दिला पाहिजे.त्यांनी ती उचलून फ्रिजमधे ठेवली.जावईने विचारले,अहो,ती उष्टी सालटी आणि तुम्ही फ्रिजमधे…..?

    ते म्हणाले , माझ्या मुलाला कामात येईल.यात अतिशयोक्ती ,प्रहसन वाटत असले तरी त्यातील गर्भितार्थ गांभिर्याने घेतला पाहिजे.बाप बिचारा मुलांसाठी असेही काम करतो.नोकरीत असतांना गोर गरीबांना लुटतो.भाऊ बंद , नातेवाईकांशी एक एक चाकोरीसाठी हाणामारी किंवा कोर्ट कचेरी करतो.मुलांसाठी इतके पाप करूनही म्हातारपणात मुले सांभाळत नाहीत.याचे आकलन झाले पाहिजे.म्हणून दुसरी इयत्तेतच वाल्मिक दादांचा धडा शिकवला जातो.वाल्मिक दादा माणसे मारून रस्ता लूटतो.जितकी माणसे मारली तितकेच खडे रांजणमधे टाकतो.सात रांजण भरले.म्हणून नारदाने येऊन उपदेश केला.बापा, वाल्मिक दादा,हे थांबव.तू मुडदे पाडून पाप करतो,कमावतो.ते बायको पोरं सुद्धा खातात.तर मग, त्यांना विचारून घे कि, तुम्ही माझ्या कमाईचा उपभोग घेतात तर माझ्या पापात ही सहभागी होणार का? असे विचारले तर बायको पोरांनी चक्क नाही म्हटले.तुम्ही रस्ता लुटा कि नगरपालिका लुटा, आम्हाला काय घेणे देणे?आम्ही तुमच्या पापात सहभागी होणार नाहीत 

    असे उत्तर मिळताच,वाल्मिक दादांचे डोळे खाडकन उघडले.ते नारदमुनींची क्षमा मागतली.मी चुकलो.मी पापी आहे.मला पापक्षालन करण्याचा उपाय सुचवा.म्हणून राम राम म्हणा.भारतखंड फिरुन रामाची माहिती मिळवा.रामाचे चरित्र लिहा.ते चरित्र लोकांपर्यंत पोहचले कि,तुमचे पापक्षालन होईल.हा धडा फक्त जावई पुरता नाही.हा धडा सासरा,साला यांच्यासाठी सुद्धा आहे.बाप,भाऊ,मुलगा,नातू यांच्या साठी सुद्धा आहे.पोलिस,तलाठी, तहसीलदार,बीडीओ, कलेक्टर यांच्या साठी सुद्धा आहे.पण ते धडा वाचून परीक्षा देतात,पास होतात,धडा विसरून जातात.तेच वाल्मिक दादांसारखे लोकांना लुटण्याचे काम करतात.ते धडा विसरले आहे.विसरले म्हणून हे स्मरणपत्र आहे.

    मुले ,मुली शाळेत सहा तास असतात.अठरा तास घरी असतात.तेंव्हा त्यांचे तीनपट गुरू तर आईबाप असतात.शाळेत सामान्य ज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान शिकवले जाते.पण घरी नितीशास्र शिकवले पाहिजे.आईबाप,भाऊ बहिण आपसात फक्त संपत्ती च्या गोष्टी करतात.नितीमत्तेच्या गोष्टी करीत नाहीत.हे त्याचे आहे,परत कर.हे त्याचे आहे,लुबाडून आणू नकोस.असे शिकवले जात नाही.आपण भाऊ बहिण काका चुलते,साले मेव्हणे एकमेकांशी कसे बोलतो,काय बोलतो,कसे व्यवहार करतो ,कशी परतफेड करतो,कसे ऋण फेडतो यावर चर्चा करीत नाहीत.म्हणून मुला मुलींना नितीमत्तेचे धडे मिळत नाहीत.सर्वच धडे शिक्षकांवर सोपवून चालणार नाही.खरी जबाबदारी आईबापाची आहे.

    आता, किमान आता तरी, प्रत्येक घरात सकाळपासून टिव्ही चालतो.चुनरी जो सरकी सरसे, धीरेधीरे.अशी गाणी चालतात.जर सकाळपासूनच अशी गाणी कानावर पडत असतील तर ,चुनरी वापरण्याची इच्छा होत नाही.आजची तरूण तरुणी सामाजिक, राजकीय बातमी पाहात नाहीत.ते पाहातात सिनेमा,चित्रहार ,सिरीयल किंवा क्रिकेट.जेथे नितीमत्तेचा लवलेश नसतो.असते फक्त करमणूक.तमाशा,जलसा सारखी.तर कसे होतील संस्कार? कशी शिकणार नितीमत्ता?हे सांगणारा नारद आता उपलब्ध आहे.जो आहे,त्याला विचारले जाते, तुम्हाला यातून काय मिळते?काय मिळते?नारदाने काही मिळवण्यासाठी वाल्मिक दादांना उपदेश केला होता का? नारदाची कुठेही शाळा, कॉलेज, पेट्रोल पंप,दारू दुकान,सट्टापेढी,पतपेढी नाही.उलट वाल्मिक दादांना राग येऊन नारदमुनींचा खून केला असता.जसा महात्मा गांधींचा झाला.दाभोळकर,पानसरेंचा झाला.पण बरे झाले,वाल्मिक दादांनी थोडे संयमाने,सबुरीने, विश्वासाने घेतले.माझाही होऊ शकतो.चुकले ते चुकले.आज तरी सावध झाले पाहिजे.पोटची मुले जर आईबापाचा सांभाळ करीत नसतील,जड वाटत असतील तर,हे आपल्या पापाचे फळ समजून उपाय केला पाहिजे.खूप चांगले मुले,मुली आहेत.पैकी एखादा पारखून दत्तक घ्या.त्याचेकडे म्हातारपणाची जबाबदारी द्या.सुखरूप जगा.विसरा मुलांना,जे अहसानफरामोश आहेत.जे बेईमान आहेत.जे लफंगे आहेत.जे अमानुष आहेत.जे जनावरे आहेत.

    ✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
    जळगाव