जुन्नर पोस्ट ऑफिस मध्ये कवी यशवंत घोडे यांच्या शुभहस्ते पोष्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार

    52
    Advertisements

    ✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

    पुणे(दि.12ऑक्टोबर):-जागतिक टपाल दिन सप्ताह निमित्त नक्षत्राचं देणं काव्यमंच आयोजित राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष कवी वादळकार यांच्या आयोजनानुसार जुन्नर तालुका जिल्हा पुणे येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात कविवर्य यशवंत घोडे.. नक्षत्राचं देणं काव्यमंच जुन्नर शहराध्यक्ष यांनी जाऊन कार्यालयातील पोस्टमास्टर जाधव मॅडम, शेळके सर,उंबरे सर डगळे सर पोस्टमन सावंत,शिराळशेठ,कामटकर कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

    व निसर्ग पूजक काव्यसंग्रहाची एक प्रत भेट देण्यात आली.
    पोष्ट विभाग प्रामाणिकपणे देशसेवेचे कार्य करत आहे.राष्टीय उभारणीमध्ये पोष्टविभागाचा मोठा वाटा आहे.कर्मचारी वर्गाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी यावेळी सर्व पोष्ट कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला.तसेच जुन्नर तालुच्यातील खामगाव येथे सुध्दा कवी ज्ञानेश्वर काजळे यांनी हि कर्मचारी वर्गाला फेटा,शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

    कविवर्य यशवंत घोडे यांनी आपली स्वरचित कविता सादर केली .

    *टपाल दिन*

    आज जागतिक टपाल दिन
    सप्ताह सर्वत्र होतोय साजरा
    माझा डाक सेवा पुरवणाऱ्या
    कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा..

    लॉकडाऊनच्या काळात डाक
    कर्मचारी मदतीला धावले
    पीपीई किट घालून आजारी वृद्ध
    व्यक्तींना औषधोपचार पुरवले..

    भारतीय टपाल तिकीट आहे
    मौल्यवान इतिहासाचा ठेवा
    इंटरनेटच्या जाळ्यात अजूनही
    सक्रीय आहे टपाल सेवा..

    स्पर्धेच्या आधुनिक युगात सोशल
    मीडियामुळे पत्राचा विसर पडला
    भूतकाळात पत्र ऐतिहासिक
    सुख दुःखाचा साक्षीदार घडला..

    टपालाने आपल्या माणसांपर्यंत
    तत्पर पोहोचवल्या भावना,इच्छा
    टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना
    टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    ————————————-
    यश घोडे फोफसंडीकर