राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेन्ट बडनेरा येथे वाचन प्रेरणा दिवस निमित्य विद्यार्थ्यां – मॅनेजमेन्ट संवाद मेळावा

    48
    Advertisements

    ✒️बडनेरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

    बडनेरा(दि.15ऑक्टोबर):-स्थानिक बडनेरा येथील प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथील आयक्यूएसी आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकद्वारे “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयात भारताचे ११वे राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य “जागतिक विद्यार्थी दिवस व वाचन प्रेरणा दिवस” निमित्त्य उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख् वक्ते म्हणून लाभलेले विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीचे उपाध्यक्ष अड उदयजी देशमुख यांनी दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांमधून एक-एक करीत विद्यार्थ्यांदवारे प्रश्न घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांना नैतिक मूल्यांचे धडे दिले तसेच चर्चेदरम्यान उपस्थित शंकांचे निराकरण करण्यात आले.

    सर्वप्रथम मान्यवरांनी कलाम यांचं जयंती निमित्य यांच्या प्रतिमेला हारार्पण व अभिवादन करीत कलाम यांच्या कार्यासंबंधित माहिती दिली व जागतिक विद्यार्थी दिवसाचे महत्व सांगितले तदनंतर संस्था पदाधिकारी व विद्यार्थी संवादाला सुरवात करण्यात आला. प्रथम सत्रात इलेक्ट्रिकल आणि आयटी डिपार्टमेंट तसेच द्वितीय सत्रात सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. च्या कार्यक्रमाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, उपाप्राचार्य प्रा पि व्ही खांडवे, विभाग प्रमुख डॉ पि ए खोडके, प्रा ए व्ही मोहोड, डॉ के एन कासट, डीन ऍकॅडेमिक डॉ मनीष बैस, आयक्यूएसीचे डॉ किरण डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी सोलव आणि आमिर फराझ यांनी केले तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करीत सहभाग दिला.

    कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन महाविद्यालयीन डीन ऍकॅडेमिक डॉ मनीष बैस आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. गायत्री बहिरे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अपर्णा खैरकर, प्रा अतुल डहाणे, श्री. निशांत केने, रासेयो दूत पूजा सोनोने, सुरज राठोड, रुद्रेश चव्हाण, वेदांत वंदिले व अन्य रासेयो स्वयंसेवक यांच्या सहभागाने केले.कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, सचिव श्री. युवराजसिंगजी चौधरी, सदस्य श्री. शंकरराव काळे, श्री. नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.