✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.17ऑक्टोबर):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत गो.सी.गावंडे महाविद्यालय येथे क्रिकेट ‘एच’ झोनचे सामने दि. 01 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान संपन्न झाले.
या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून 14 संघांनी सहभाग नोंदविला अंतिम सामना बी.एन. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद विरुद्ध गो.सी.गावंडे महाविद्यालय, उमरखेड यांच्यात झाला या सामन्यामध्ये बी. एन. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद यांना विजेते पद प्राप्त झाले असून गो.सी. गावंडे महाविद्यालय यांना उपविजेतेपद प्राप्त झाले.
या सामन्याच्या समारोपीय बक्षीस कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. कदम तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथील डॉ. अग्रवाल डॉ. पाटील तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ.बी. एम. सावरकर प्रा. पांडे यांच्या उपस्थितीत दोन्ही संघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा संकुल चे कोच श्री सिद्धार्थ जगताप यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्राध्यापक डॉ. सावरकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला क्रीडा समितीचे सदस्य डॉ. आराख तसेच प्रा.डाँ. अनासाने प्रा. अभय जोशी प्रा.डा. जांभेकर तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, कर्मचारी हे उपस्थित होते.
या सामन्याच्या यशस्वी आयोजना करिता मो. शकील, सिद्धार्थ जगताप, चंद्रकांत शिंदे यांनी परिश्रम घेतले तसेच विविध सामने यशस्वीतेसाठी आनंद वाढवे, विकास माने यांनी अंपायर म्हणून काम बघितले. या अंतिम सामन्याच्या विजेते, उपविजेते संघाला संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर सचिव डॉ. या. मा. राऊत, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार माळवे साहेब तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी दोन्ही संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यांच्या महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ.बी. एम. सावरकर व इतर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले व सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या.