?मध्यरात्री ज्ञानेश्वर पवार यांची मोटरसायकल [ स्ल्पेन्डर प्लस ] MH -19 AW – 7613 चोरीला !……
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगांव(दि.4नोव्हेंबर):- धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर येथे चोरीचे सत्र सुरूच आहे सविस्तर माहिती अशी की, कृष्ण गीता नगर गट नंबर ५४६ येथील प्लॉट नंबर ५९ मधील ज्ञानेश्वर सखाराम पवार यांची मोटरसायकल [ स्प्लेन्डर प्लस ] आज मध्यरात्री सकाळी २ : ३० ते ३ : ३० च्या सुमारास चोरीला गेली आहे.
सकाळी ४ वाजता उठून ज्ञानेश्वर पवार यांना लक्षात आले की, आपली मोटरसायकल चोरीला गेली त्यांनी आजूबाजुचा परिसर शोधला पण मोटरसायकल आढळून आली नाही तरी त्यांनी पोलीस स्टेशन धरणगाव येथे प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली .
धरणगाव शहरात किंवा परिसरात कुणाला मोटरसायकल [ स्प्लेन्डर प्लस ] आढळून आली तर ज्ञानेश्वर सखाराम पवार मो. 8208678878 किंवा धरणगाव पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा.