डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न

    44
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.29नोव्हेंबर):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांनी भूषविले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा. डॉ. दिलीप घोरमोडे, महात्मा गांधी कॉलेज, आरमोरी, प्रा. नाशिक गेडाम, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. तुफान अवताडे विचार मंचावर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची आजच्या संदर्भात प्रासंगिकता याविषयी प्रतिपादन केले.

    आपल्या प्रमुख मार्गदर्शनात प्रा. डॉ. दिलीप घोरमोडे यांनी महात्मा फुले यांचे आर्थिक विचार या विषयावर मार्गदर्शन केले.

    प्रा. नाशिक गेडाम यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

    याप्रसंगी कु. बुद्धप्रिया खोब्रागडे या विद्यार्थिनीने महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करणारी स्वरचित कविता गायली तर यश शेंडे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हिराणी नवघडे, प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे तर आभार कु. सानिका ईस्टाम यांनी केले.