महापुरूषांविषयी आवमान कारक वक्तव्ये करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ तलवाड्यात कडकडीत बंद

    54
    Advertisements

    ✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

    गेवराई(दि.12डिसेंबर):-तालुक्यातील तलवाडा येथे राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ सर्वसमावेशकरित्या बंदचे आवाहन स्थानिक प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आले होते. त्या आणुषंगाने दिं. १२/१२/२०२२ सोमवार रोजी तलवाड्यात सर्व व्येवसाय बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. या बाबत अधिक माहिती आशी की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापुर्वी महाराष्ट्राची आसिम्ता छत्रपति शिवाजी महाराज बद्दल आवमान कारक वक्तव्ये केले होते.

    त्या पाठोपाठ मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा जोतीराव फुले यांच्या विषयी नुकतेच आवमान कारक वक्तव्ये केल्याची घटना समोर आल्याने राज्यभरातुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला जात असुन त्या आणुषंगाने गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे शनिवार दिनांक १०/१२/२०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सर्वसमावेशकरित्या बैठक घेऊन स्थानीय पोलिस प्रशासनास निवेदन देऊन सोमवार दि.१२/१२/२०२२ रोजी तलवाडा बंद ठेवून निषेध व्येक्त करण्याची हाक देण्यात आली होती.

    महापुरुषांच्या झालेल्या आवमान प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी सर्व समाजातील समाज बांधवानी आप आपली सर्व दुकाने, व्यापार, व्यवहार कडकडीत बंद ठेऊन निषेध व्येक्त करण्यात आला या वेळी तलवाडा पोलिस स्टेशनचे सपोनि प्रताप नवघरे व त्यांच्या सर्व पदाधिकारी वर्गाने चोक बंदोबस्त ठेवत सहकार्य केले.