महिला रुग्णालयाचे काम 31 जुलैपर्यंत पूर्ण करा- डॉ.राजेंद्र भारुड

    88
    Advertisements

    ✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

    नंदुरबार(दि.21जुलै):- महिला रुग्णालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येत असल्याने इमारतीची आवश्यक कामे 31 जुलै पर्यंत पूर्ण करावीत आणि ऑक्सिजन व्यवस्थादेखील त्वरीत निर्माण करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

    डॉ.भारुड यांनी इमारतीला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. त्याच्या समवेत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी होते.

    रुग्णांना सर्व चांगले उपचार दिले जातील यादृष्टीने व्यवस्था उभारण्यात याव्यात. भविष्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. बेड्स व इतर अनुषंगीक व्यवस्था त्वरीत करण्यात यावी व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात इमारतीचा उपयोग होईल असे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. त्यांनी पीसीआर लॅबच्या कामाचीदेखील पाहणी केली व इमारतीच्या कामाविषयी संबंधितांशी चर्चा केली.