✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.6ऑक्टोबर):-जिल्हा परिषद, चंद्रपूर मधील रिक्त पदांची पदभरती जाहिरात दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याअनुषंगाने 8 संवर्गाची संगणकीय परीक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत दि. 7 ते 11 ऑक्टोबर 2023 या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी, रिंगमन (दोरखंडवाला) आणि वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदासाठी पुजा इन्फोसिस्टिम चंद्रपूर, इंडस्ट्रियल एरिया, बंगाली कॅम्प, चंद्रपूर या ठिकाणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
8 ऑक्टोबर रोजी विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदासाठी कोटकर इन्फोसिस्टिम, ट्राय स्टार हॉटेलच्या मागे, सीटीपीएस रोड चंद्रपूर, पुजा इन्फोसिस्टीम चंद्रपूर आणि श्री. साई पॉलीटेक्निक ट्रायस्टार हॉटेल जवळ चंद्रपूर या ठिकाणी, 10 ऑक्टोबर रोजी विस्तार अधिकारी (कृषी) या संवर्गासाठी कोटकर इन्फोसिस्टीम, ट्रायस्टार हॉटेलच्या मागे, सीटीपीएस रोड चंद्रपूर, पुजा इन्फोसिस्टिम चंद्रपूर, इंडस्ट्रियल एरिया, बंगाली कॅम्प, चंद्रपूर, श्री. साई पॉलीटेक्निक ट्रायस्टार हॉटेल जवळ चंद्रपूर आणि बजाज पॉलिटेक्निक बालाजी वार्ड, चंद्रपूर या ठिकाणी. तर त्याचदिवशी 10 ऑक्टोबर 2023 रोजी आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी कोटकर इन्फोसिस्टीम ट्रायस्टार हॉटेलच्या मागे, सीटीपीएस रोड, चंद्रपूर या ठिकाणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
11 ऑक्टोबर 2023 रोजी लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदासाठी कोटकर इन्फोसिस्टीम, ट्रायस्टार हॉटेलच्या मागे, सीटीपीएस रोड चंद्रपूर या ठिकाणी तर त्याचदिवशी 11 ऑक्टोबर रोजी कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदासाठी पुजा इन्फोसिस्टीम चंद्रपूर, इंडस्ट्रियल एरिया, बंगाली कॅम्प, चंद्रपूर, श्री. साई पॉलीटेक्निक ट्रायस्टार हॉटेल जवळ चंद्रपूर, कोटकर इन्फोसिस्टीम, ट्रायस्टार हॉटेलच्या मागे, सीटीपीएस रोड चंद्रपूर तसेच बजाज पॉलिटेक्निक बालाजी वार्ड, चंद्रपूर या ठिकाणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी कळविले आहे.