चंद्रपूरच्या महाकाली महोत्सवात “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाचे आयोजन

    245
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.२० ऑक्टोबर):-गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागडच्या सुपुत्राची, आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाचा प्रयोग दि.२१ ऑक्टोंबर २०२३ ला दु.२ वा. चंद्रपूर येथील महाकाली महोत्सवात भव्य दिव्य स्वरुपात सादर होत असून रसिक प्रेक्षक मोठ्या उत्साहाने या नाटकाच्या प्रयोगाची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे.

    झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी या नाटकाचे लेखन केलेले असून, प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी त्यांच्या लोकजागृती संस्था, चंद्रपूरच्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे. सिनेस्टार मुन्ना बिके, निखिल मानकर, राजरत्न पेटकर, संजीव रामटेके, सुरज चौधरी, गुरू मोहूर्ले, अविनाश कडूकर, अमित दुर्गे, यश शेंडे, वेदांत मेहता, अंकुश शेडमाके, भाष्कर मडावी, शुभम गुरनुले, गणेश मडावी, मयुर मस्के, अनुराग मुळे, स्नेहल वाडगुरे आदी पुरुष कलावंत आणि करिश्मा मेश्राम, रुपाली खोब्रागडे, नयना खोब्रागडे, प्रियंका सिडाम, माधुरी ढोरे, मनिषा बावणे, प्रविण लाडवे, संजना येलेकर, राजश्री, स्मिता, भावना आदी स्त्री कलावंतांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली यांचे “नाट्य प्रशिक्षण शाळेत” प्रशिक्षीत ३५ कलावंत भुमिका करीत आहेत.

    रेला नृत्य, आकर्षक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत या नाटकाचे खास आकर्षण आहे. प्रत्यक्ष रंगमंचावर साकारणारे क्रांतियुध्द अंगावर रोमांच उभे करणारे आहे. या नाट्यप्रयोगाची माहिती आमच्या कार्यालयास श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी अवगत करून दिली आहे.