संत जनाबाई महाविद्यालय, येथे निवडणूक साक्षारता मंडळाची स्थापना

    194
    Advertisements

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.28ऑक्टोबर):-भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने सुचित केल्याप्रमाणे, गंगाखेड निवडणूक कार्यालय व महात्मा गांधी ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत जनाबाई महाविद्यालयात दिनांक 27 ऑक्टोबर शुक्रवार रोजी निवडणूक साक्षाता मंडळाची स्थापना करण्यात आली.

    यावेळी महाविद्यालयांचे प्राध्यापक डॉ. सुर्वे यांची नोडल अधिकारी पदी जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र निवडणूक प्रकल्प समन्वयक सुरेश इखे यांच्या हस्ते देण्यात आले तर महाविद्यालयातील विद्यार्थी जय पवार यांची सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली.

    याप्रसंगी सुरेश इखे यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षारता मंडळाचे कार्य व उद्दिष्ठांसह लोकशाही चे महत्त्व समजावून सांगितले. नवनियुक्त नोडल अधिकारी प्रा. डॉ.सुर्वे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे नियोजनासाठी प्रकल्प सहायक अंकुश कांबळे यांनी मदत केली व आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.