अंतरवली सराटी येथे चालू असलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा

    313
    Advertisements

    ✒️धाराशिव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    धाराशिव(दि.30ऑक्टोबर):- अंतरवली सराटी येथे चालू असलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी बेंबळी तालुका धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साखळी उपोषनास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. मराठा समाजास आरक्षण भेटत नही तोपर्यंत साखळी उपोषण करण्यात येईल व प्रत्येक पक्षाच्या पुढऱ्यांना गावाबंदीचे बॅनर ही मराठा समाजातर्फे लावण्यात आले.पहिल्या दिवशी बेंबळीचे सरपंच नितीन बाप्पा इंगळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कणसे, नितीन खापरे पाटील अजित खापरे पाटील अजित माने, सुधीर निकम, प्रकाश मुंगळे, सचिन खापरे पाटील, अविनाश खापरे, महेश विठ्ठल खापरे, तुषार मोहिते, दादा माने, कपिल शिडुळे हे साखळी उपोषणास बसले होते.

    यावेळी बेंबळीतील मराठा समाजातील व इतर समाजातीलही प्रतितष्टीत नागरिक उपस्थित होते. कविता, पोवाडे व आरक्षणवरील गीतांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी धनगर समाजातर्फे पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावडे यांनी वीरशैव लिंगायत समाजातर्फे लिंगायत समाज बेंबळी चे अध्यक्ष प्रकाशभाऊ भडंगे यांनी गुरव समाजातर्फे बेंबळी ग्रामपंचायत सदस्य राजभाऊ नाळेगावकर यांनी, मुस्लिम समाजातर्फे इफ्तेकार शेख यांनी व बौद्ध समाजातर्फे बेंबळी ग्रामपंचायत सदस्य विद्या माने यांनी बेंबळीतील मराठा समाजाच्या साखळी उपोषणास पाठिंबा दर्शवीला.

    यावेळी बेंबळीचे माजी सरपंच मोहन खापरे पाटील,माजी सरपंच जीवन बरडे, श्रीकृष्ण खापरे पाटील,श्याम व्हनसनाळे, नेहरू निकम, प्रकाश शेळके, पद्माकर निकम, पंकज बरडे, आकाश मुंगळे,दिनेश हेड्डा, विकास शिंदे, नागनाथ खापरे,रामभाऊ मोटे, विकास खापरे सर, चंद्रकांत खापरे, धनाजी भोसले, बाळासाहेब निकम बाळासाहेब माने, मोहन माने, विश्वजीत बरडे, राहुल मुंगळे वारकरी साहित्य परिषद धाराशिव तालुका अध्यक्ष मोहन वाघुलकर, हनुमंत खापरे पाटील, ज्ञानोबा निकम, संतोष आगलावे, राजभाऊ रसाळ, शिवाजी गंभीरे, सचिन निकम,अवी पवार, शीतल फुलचंद शिंदे, राहुल मुंगळे, अभिषेक माने, ओंकार खापरे, अनिकेत निकम, कृष्णा उपाध्ये, श्रीकांत शिवलकर, आबा माने, दिनेश माने, भगवान खापरे, जालिंदर माने, किरण इंगळे,संजय खापरे, व रणजित निकम आदी उपस्थित होते.