अमरदीप लोखंडे यांची महात्मा ज्योतीबा फुले समाजगौरव पुरस्कारासाठी निवड

    185
    Advertisements

    ?मदत सामाजिक संस्थेतर्फे सन्मानित

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.4नोव्हेंबर):- अमरदीप प्रल्हाद लोखंडे यांना महात्मा ज्योतीबा फुले समाजगौरव पुरस्कार देवून मदत सामाजिक संस्थेतर्फे सन्मानित कण्यात येत आहे. अमरदीप लोखंडे हे मूळचे रा. अर्हेर- नवरगावचे असून यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून महात्मा ज्योतीबा फुले समाजगौरव पुरस्कार या पुरस्काराकरिता निवड केलेली आहे.

    ‘मदत सामाजिक संस्था’ द्वारा ‘एकविसावे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता सम्मेलन व पुरस्कार सोहळा’ रविवार दि. 05 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 10.30 वाजता श्री गुरुदेव सेवाश्रम, आगाराम देवी चौक, सुभाष रोड, नागपूर येथे आयोजित केलेला आहे. या सम्मेलनात आकर्षक स्मृतीचिन्ह, दुपट्टा, पुष्पगुच्छ आणि संविधानाचे पुस्तक देऊन ‘सन्मान करण्यात

    येत आहे. अमरदीप लोखंडे यांची समाजगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे परिवाराकडून व मित्रमंडळीकडून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.