महात्मा जोतिबा फुले आधुनिक भारताचे शिल्पकार – सादीक खाटिक

    368
    Advertisements

    *सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

     

     

    म्हसवड : लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या वैश्विक मुल्यांना पायाभूत मानून महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी भारतीय समाजाचे परिवर्तन घडवून आणणारे महात्मा जोतिराव फुले आधूनिक भारताचे शिल्पकार होते . असे मत ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते आटपाडीचे सादिक खाटीक यांनी व्यक्त केले.
    क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अग्रणी सोशल फौंडेशन विटाच्या वतीने विटा हायस्कुल विटा येथे वंचित, उपेक्षित समुहातील आदर्शवत व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या अस्मिता पवार ( विटा ) आणि रेश्मा पिरजादे ( लेंगरे ) या शिक्षिकेंना सत्यशोधक शिक्षक प्रेरणा पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलताना सादिक खाटीक यांनी हे मत व्यक्त केले .
    विटा हायस्कुल आणि ज्यूनियर कॉलेज विटाचे प्राचार्य हणमंतराव उर्फ एच . एस . जाधव, कडेगांवचे अशोक पवार , रामानंदनगरचे आदम पठाण सर, अस्मिता पवार, रेश्मा पिरजादे, एस. बी . वारे सर, कु .विभावरी फिरमे, कु . आकांक्षा पाटील, मयुरेश कुलकर्णी, सुरेश पवार इत्यादींची महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा यशोचित गौरव करणारी भाषणे यावेळी झाली .
    महात्मा फुले यांनी भारतात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षित करून केली . स्त्रियां, अस्पृश्य, मजुर, शेतकरी या सर्वांसाठी शाळा सुरु केली . महात्मा फुले हे जात, धर्म, प्रांत, राष्ट्र, या सीमा ओलांडून वैश्विक बंधुत्व निर्माण करणारे महामानव होते . महात्मा जोतिराव फुले हेच खरे महात्मा आहेत, असा निर्वाळा महात्मा गांधी यांनी पुण्यात बोलताना दिला होता . महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिनी अथवा जयंती दिनी देशभर शिक्षक दिन साजरा करून फुले यांच्या शैक्षणीक व समतेच्या कार्याला खरी मानवंदना दिली पाहिजे . असे ही सादिक खाटीक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .
    यावेळी अग्रणी सोशल फौंडेशनचे सचीव मुनीर शिकलगार, सामाजीक कार्यकर्ते नेते साहेबराव कदम गोमेवाडी, आटपाडी तालुक्याचे युवा नेते असिफ उर्फ बाबुभाई खाटीक, घरनिकीच्या नेत्या यास्मीन जावेद काझी, अग्रणी सोशल फौंडेशनचे सुहासिनी शिंदे, विद्या घाडगे, गणेश धेंडे, राजेंद्र सोनवले, एम . एम . वागतकर, सौ .यु . बी . येलपले, सौ . एस . एम . सुर्यवंशी, सौ . एम . बी . निवळे, सौ . ए . एस . बाळीकाई , सौ . एम . डी . दिवटे, सौ . एन . के . धनवडे, सौ. एस . व्ही . शितोळे, सौ . एन . डी . सुतार, सौ . व्ही . ए . वानकर, श्री . बी . एम . भंडारे इत्यादी अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते .
    प्रारंभी अग्रणी सोशल फौंडेशनच्या मुख्य संचालिका शोभाताई लोंढे यांनी स्वागत व प्रास्तावीक केले . सुत्रसंचालन ए . टी . सुतार यांनी केले . मानपत्राचे वाचन करीना मुल्ला, विशाल भिंगारदिवे यांनी तर महिलाहिंसाचार विरोधी प्रतिज्ञावाचन आभार संचालिका यास्मीन पिरजादे यांनी मानले .